पिंपरी चिंचवड
उद्योजक विजय जगताप यांचा वाढदिवस; नागरिकांनी नारायणपूरचे केले मोफत दर्शन

चिंचवड : उद्योजक विजय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळेगुरव व सांगवीतील नागरिकांसाठी श्री क्षेत्र नारायणपूर दर्शनासाठी मोफत बसची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे उपाध्यक्ष ललित म्हसेकर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
उद्योजक विजय जगताप हे चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू आहेत. गोमाता प्रेमी म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. त्यांचा ३ जून रोजी वाढदिवस साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ललित म्हसेकर यांनी पिंपळेगुरव व सांगवीतील नागरिकांसाठी गुरूवार ६ जून रोजी श्री क्षेत्र नारायणपूर दर्शनासाठी पीएमपीएमएल बसची मोफत सोय केली होती. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मला अध्यात्माची वाट ही उद्योजक विजय जगताप यांनी दाखविल्याचे म्हसेकर यांनी सांगितले.