प्रभाग क्रमांक १६, रावेत-किवळे-मामुर्डीमध्ये गल्लोगल्ली कमळ, जनतेचा कौल स्पष्ट
भाजपच्या दिपक भोंडवे विजयाच्या दिशेने; प्रभागातील जनता परिवर्तनाच्या तयारीत

पिंपरी : प्रभाग क्रमांक १६, रावेत-किवळे-मामुर्डीमध्ये सध्या एकच चित्र ठळकपणे दिसत असून, गल्लोगल्ली कमळ फुलले आहे आणि जनतेचा कौल स्पष्टपणे भाजपचे उमेदवार दिपक भोंडवे यांच्या बाजूने झुकला आहे. मतदानाचा दिवस जवळ येत असताना या प्रभागातील वातावरण अक्षरशः बदलले असून, परिवर्तनाचा आवाज आता दडपता येणार नाही इतका तीव्र झाला आहे. दहा-दहा वर्षे वर्षे नगरसेवक राहूनही प्रभागातील मूलभूत प्रश्नांकडे पाठ फिरवणाऱ्या, निवडणूक आली की फक्त आश्वासनांचा मारा करणाऱ्या माजी नगरसेवकांना नागरिकांकडून स्पष्ट शब्दांत नकार मिळत असल्याचे चित्र आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, सुरक्षेचे प्रश्न आणि नागरिकांच्या तक्रारी या सगळ्यांवर केवळ दुर्लक्षच झाल्याचा संताप आज घराघरांतून व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर कमळ चिन्हावर लढणारे दिपक भोंडवे हे प्रभाग १६ मधील काम, सातत्य आणि विश्वासाचे प्रतीक बनले आहेत. प्रचारादरम्यान ते केवळ घोषणा देत नाहीत, तर नागरिकांशी थेट संवाद साधत कामाचा स्पष्ट हिशेब आणि पुढील विकासाचा ठोस आराखडा मांडताना दिसत आहेत. प्रभागातील गल्ल्या, वस्त्या, सोसायट्या आणि चौकाचौकांतून एकच आवाज उमटतोय “फोटोसेशन नको, काम करणारा नेता हवा!”, “खोट्या आश्वासनांचा कंटाळा आला, आता परिणाम हवा!” कमळाच्या या प्रचाराला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता विरोधकांच्या गोटात अस्वस्थता स्पष्ट जाणवू लागली आहे.
मुद्दे नाहीत, काम नाही, उत्तर नाही उरली आहे फक्त टीका आणि सबबी, असा विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघडा पडत चालला आहे. आज प्रभाग क्रमांक १६ मध्ये परिस्थिती निर्विवाद असून, कमळ गल्लोगल्ली पोहोचले आहे. त्यामुळे या प्रभागातील जनतेचा कौल स्पष्ट झाला आहे. भाजपचे उमेदवार दिपक भोंडवे ठामपणे विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.ही निवडणूक आता केवळ उमेदवारांची नाही, तर अपयश विरुद्ध विकास, दुर्लक्ष विरुद्ध जबाबदारी आणि जुन्या राजकारणाविरुद्ध नव्या कार्यक्षम नेतृत्वाची लढाई बनली आहे. एकूणच, प्रभाग क्रमांक १६ मध्ये बदल अटळ असून, कमळ हेच जनतेच्या विश्वासाचे चिन्ह ठरत असल्याचे चित्र दिवसेंदिवस अधिक स्पष्ट होत आहे.



