बॅनर न्यूज

थांबा ! भोसरीतील सदगुरूनगरमधील या जागेच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नका

सर्व्हे क्रमांक १२५/२ब/१३/१, १२५/१ब, १२५/२ब आणि १२५/१अ/२ या जागेबाबत दिवाणी दावा प्रलंबित

Spread the love

मूळ जमीन मालक असलेल्या सहा जणांकडून सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध

पिंपरी : भोसरी येथील सद्गुरूनगर परिसरातील काही सर्व्हे क्रमांक १२५/२ब/१३/१, १२५/१ब, १२५/२ब आणि १२५/१अ/२ या जागेच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात वाद सुरू असून, या जागांची कोणत्याही प्रकारची खरेदी-विक्री अथवा अन्य व्यवहार करू नयेत, अशी सार्वजनिक नोटीस मूळ जागा मालकांनी प्रसिद्ध केली आहे. संबंधित जागेबाबत पिंपरी-चिंचवड न्यायालयात दिवाणी दावा क्रमांक ८१०/२०२६ हा प्रलंबित असल्याने नागरिक, खरेदीदार, विक्रेते, विकासक तसेच इतर संबंधित व्यक्तींनी या जागेच्या कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांपासून दूर राहून स्वतःचे आर्थिक नुकसान व फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन मूळ जागा मालकांनी या नोटीसीद्वारे केले आहे. 

मौजे भोसरी, सद्गुरूनगर, ता. हवेली, जि. पुणे येथील सर्व्हे क्रमांक १२५/२ब/१३/१, १२५/१ब, १२५/२ब आणि १२५/१अ/२ ही जागा न्यायालयीन वादाच्या अधीन असल्याचे सार्वजनिक नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. या जागेबाबात कोणत्याही व्यक्तीने खरेदी-विक्री, साठेखत, खरेदीखत, विक्रीखत, इशारा पावती, बक्षीसपत्र, दानपत्र, भाडेपट्टा अथवा ताबा हस्तांतरण यांसारखे कोणतेही व्यवहार करू नयेत. शामराव लांडगे, राजेंद्र लांडगे, अभिमन्यू लांडगे, शिवाजी लांडगे, रोहिदास लांडगे आणि संतोष लांडगे यांच्या वतीने ही सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोटिसीतील सूचनेचे उल्लंघन करून कोणीही व्यवहार केल्यास संबंधितांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटीसीत देण्यात आला आहे. 

त्यामुळे भोसरी, सद्गुरूनगर परिसरातील संबंधित जागेच्या विक्रीसाठी जागोजागी लावण्यात आलेले बॅनर, फ्लेक्स अथवा सोशल मीडियावरील जाहिराती पाहून ही जागा खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी कोणताही व्यवहार करण्यापूर्वी या न्यायालयीन वादाची माहिती घ्यावी. तसेच संबंधित जागेबाबत कोणताही आर्थिक व्यवहार करून संभाव्य कायदेशीर अडचणीत पडून स्वतःचे आर्थिक व मानसिक नुकसान करून घेऊ नये, असे आवाहन या सार्वजनिक नोटिसीद्वारे करण्यात आले आहे. 

संपर्क : या जागेसंदर्भात कोणाला अधिक माहिती हवी असल्यास 9623849870, 9822111220, 9922683301, 9175081484 आणि 9822083297 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावे, असे आवाहन मूळ जमीन मालकांनी केले आहे. 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button