पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी
पिंपरी, दिनांक २८ मे २०२४ : – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम,मुख्य लिपिक वसिम कुरेशी तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.