“विद्युत सुरक्षा पाळा आणि जिवित हानी टाळा”
पिंपरी दि.२९ मे २०२४:- नागरिकांच्या सार्वजनिक सुरक्षिततेकरीता महानगरपालिकेमार्फत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील इमारती, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर प्रकाश व्यवस्थेकरीता दिवाबत्तीची यंत्रणा उभारणेत आलेली आहे. सदर दिवाबत्ती प्रकाश व्यवस्थेची देखभाल दुरुस्तीचे काम महानगरपालिकेमार्फत आवश्यकतेनुसार करण्यात येते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व विद्युत अभियंत्यामार्फत पिंपरी चिंचवडकरांच्या सुरक्षिततेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व स्ट्रिट लाईट पोलची तपासणी करण्यात आली आहे, तसेच धोकादायक परिस्थितीमध्ये एकही पोल आढळुन येणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. या कामांमध्ये काही उणीवा/त्रुटी अथवा कोणतेही असुरक्षिततासदृश्य परिस्थिती आढळल्यास म्हणजेच पोलला शॉक लागणे, गंजलेला व धोकादायक पोल, तुटलेला जंक्शन बॉक्स, फिडर पिलर आढळल्यास खालील संपर्क दुरध्वनीवर तक्रार नोंदविण्यात यावी.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
फोन नं- ६७३३३३३३
*सारथी हेल्पलाईन.-* ८८८८००६६६६
*सारथी ऑनलाईन तक्रार नोंदणी-* sarathi@pcmcindia.gov.in
त्याचप्रमाणे इमारती व दिवाबत्तीचे खांबामधुन मनपाकडुन प्रकाश व्यवस्थेकरीता थ्री फेज ४४० व्होल्टचा वीजपुरवठा केलेला असतो. तरी नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने खालील बाबींचे कटाक्षाने पालन करावे.
● नागरिकांनी पथदिवे खांब व विद्युत य़ंत्रणेशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करु नये.
● खांबाला व फिडरपिलरला स्पर्श करु नये.
● पथदिवे खांबातुन विनापरवाना वीज घेऊ नये.
● जनावरे खांबांना बांधु नयेत.
● जंक्शन बॉक्सवर पाय ठेवुन खांबावर चढु नये.
● कपडे वाळत घालण्यासाठी खाबांना तारा बांधु नये.
● बांधकामामध्ये पथदिव्यांचे खांब घेऊ नये.
● खांबांना फ्लेक्स ,होर्डिंग्ज बांधु नये तसेच कोणत्याही प्रकारची केबल/तार खांबावरुन ओढु नये.
वरील निर्देशित प्रकारच्या कृत्यांमुळे संबंधित नागरिकांचे जिवितास धोका उत्पन्न होण्याची किंवा जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशा प्रकारच्या कृत्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवित अथवा वित्त हानी झाल्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिका अश्या दुर्दैवी घटनेस जबाबदार रहाणार नाही याची सर्व संबंधित नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.