बॅनर न्यूज
भोसरी, बालाजीनगरच्या संविधान चौकात दिव्यांग महिला व सैनिकांच्या हस्ते फडकला तिरंगा

पिंपरी : भोसरी, बालाजीनगर येथील संविधान चौकात अहिल्या प्रतिष्ठान, युवा प्रतिष्ठान आणि महेंद्रभाऊ सरवदे युवा मंचच्या वतीने दिव्यांग महिला व सैन्य दलातील अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वज फडकवून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बालाजीनगरमधील शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांच्या तालावर लेझीम खेळ सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी अंगणवाडी मदतनीस, स्नेह फाऊंडेशन, अहिल्या प्रतिष्ठान, युवा प्रतिष्ठान, संविधान ग्रुप, महेंद्रभाऊ सरवदे युवा मंच, तथागत बुद्ध विहार, एमआयडीसी रिक्षा स्टँड, समता लेझीम संघाच्या सदस्यांसह विद्यार्थी, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दिव्यांग महिला संगिता गायकवाड, भारतीय सैन्य दलातील नायब माटे, हवालदार महाजन, राऊत यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर आकाशात पांढऱ्या रंगांची कबुतरे सोडण्यात आली. त्यातून शांती आणि एकतेचा संदेश देण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजीनगरमधील सर्व संघटना व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. देशभक्तीच्या घोषणांनी आणि राष्ट्रगीताच्या स्वरांनी संपूर्ण परिसर देशप्रेमाने भारून गेला होता. बालाजीनगरमधील शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांच्या तालावर लेझीम खेळ सादर केला.