सीमा सावळेंनी कोट्यवधींच्या फ्लॅटमध्ये पळ काढला; प्रभाग ८ ला लुटणाऱ्यांना पुन्हा संधी देणार का?
न लुटणारा, घराशेजारी राहणारा, सतत डोळ्यासमोर असणारा; धनुष्यबाणाच्या महेंद्र सरवदेला पसंती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८, इंद्रायणीनगर–बालाजीनगरमधील नागरिकांसमोर फक्त एक निवडणूक नाही, तर त्यांच्या विश्वासाची, हक्कांची आणि तुमच्या भवितव्याची परीक्षा उभी आहे. या प्रभागातील अ जागेवर लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सीमा सावळे या स्वतःला सामान्य, गरीब कुटुंबातील सांगत असल्या तरी वास्तव मात्र वेगळेच चित्र दाखवते. पुणे–मुंबई एक्स्प्रेस वेजवळील अतिश्रीमंत लोढा बेलमोंडोसारख्या उच्चभ्रू सोसायटीत तब्बल १ कोटी १३ लाख ७२ हजारांचा फ्लॅट खरेदी तिकडेच त्या राहायला गेल्या आहेत.सावळे यांनी हा प्रभाग सोडून कधीच पळ काढला आहे. आता त्यांना आपली संपत्ती आणखी १० हजार पट वाढविण्यासाठी नगरसेविका व्हायचे आहे. भाजपचे उमेदवार डॉ. सुहास कांबळे हे या प्रभागातील नागरिकांना मोफत उपचार देऊ शकणार नाहीत हे वास्तव आहे. अशा परिस्थितीत प्रभागातील नागरिकांच्या घराशेजारी राहणारा, सतत डोळ्यासमोर असणारा, रात्री-बेरात्री कधीही आवाज दिला की मदतीला धावणारा आणि शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढणारा उमेदवार महेंद्र सरवदे यांनाच निवडले तरच या प्रभागाच्या विकासाला ताकद मिळणार आहे. अन्यथा या प्रभागातील नागरिक स्वतःच स्वतःच्या फसवणुकीला कारणीभूत ठरतील, असे चित्र आहे.
सामान्य घरातील सांगणाऱ्या सीमा सावळे महापालिकेत भ्रष्टाचाराच्या डायनासोर म्हणून ओळखल्या जातात. प्रत्येक कामात टक्केवारी, महिला म्हणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणे हाच त्यांचा राजकीय धंदा झाला आहे. त्यातूनच त्या आज कोट्यवधी संपत्तीच्या मालकीण झाल्या आहेत. २०१७ साली अवघी २ लाख ३२ हजार इतकी जाहीर संपत्ती असलेल्या सीमा सावळे २०२६ मध्ये थेट ३ कोटी २९ लाखांच्या मालकीण झाल्या आहेत. म्हणजेच त्यांच्या संपत्तीत तब्बल ४ हजार ३८० टक्के वाढ झाली आहे. त्यांनी आठ वर्षांत सात कंपन्यांमध्ये १ कोटी ४३ लाखांची गुंतवणूक केली आहे. ३०–४० लाखांच्या फॉर्च्युनर किंवा इनोव्हा गाड्यांतून फिरणाऱ्या सीमा सावळे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मात्र १५ हजारांची दुचाकी आणि १ लाखांची वॅगनआर दाखविले आहे. ही इंद्रायणीनगर आणि बालाजीनगरमधी जनतेची फसवणूक नाही तर काय आहे, असा सवाल आता केला जात आहे.
प्रभाग सोडून शहराबाहेर अतिश्रीमंत सोसायटीत आलिशान आयुष्य जगणाऱ्या सीमा सावळे यांनी या प्रभागात वर्षातून कधी तरी एकदा दहीहंडी आणि दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांनाच नागरिकांना दर्शन दिले आहे. त्या आता सध्या परदेशात फिरायला जास्त असतात. त्यामुळे त्यांना इंद्रायणीनगर–बालाजी
दुसरीकडे भाजपचे उमेदवार डॉ. सुहास कांबळे हे डॉक्टर असले तरी सामान्य माणसाच्या खिशाला परवडतील का?, हा प्रश्न आहे. आजचा अनुभव सर्वांनाच ठाऊक आहे की आजार असो वा नसो, हॉस्पिटलचे बिल मात्र भरभक्कमच असते. डॉ. सुहास कांबळे यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलेल्या प्रभागातील नागरिकांना ते मोफत उपचार देतील की निवडणुकीत झालेला खर्च वसूल करतील, याबाबत साशंकता आहे. मग या प्रभागातील मतदारांसमोर उरतो कोण?, तर हक्काचा माणूस महेंद्र सरवदे.
बालाजीनगरमध्येच वाढलेला, तुमच्या डोळ्यासमोर लहानाचा मोठा झालेला, रात्री–बेरात्री हाक मारली तरी धावून येणारा, कधी कोणाला लुटून न खाणारा, धनुष्यबाण घेऊन लढणारा शिवसेनेचा उमेदवार महेंद्र सरवदे. तो श्रीमंत नाही, पण तो तुमच्यातला आहे. तो आलिशान सोसायटीत नाही, पण तो तुमच्या घराशेजारी आहे. तो निवडणुकीपुरताच नमस्कार करणारा नाही, तर पाचही वर्षे तुमच्यासोबत उभा राहणारा आहे, अशी या उमेदवाराची ओळख झाली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ८ मधील सीमा सावळे किंवा डॉ. सुहास कांबळे यांना दिलेलं मत म्हणजे या प्रभागातील जनतेच्या शोषणाला बळ देणं ठरणार आहे. दुसरीकडे महेंद्र सरवदे यांना दिलेलं मत म्हणजे तुमच्या हक्काला, तुमच्या आवाजाला आणि तुमच्या प्रभागाच्या विकासाला ताकद देणं, ठरणार आहे, अशी भावना प्रभागातील नागरिकांची आहे. घराशेजारी राहणारा, सतत डोळ्यासमोर असणारा, तुमचं दुःख–सुख समजणारा उमेदवार निवडा, असे आवाहन या प्रभागातील नागरिक एकमेकांना करताना दिसत आहेत.



