प्रभाग क्रमांक १५, आकुर्डी गावठाण-निगडी प्राधिकरणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची भव्य सांगता
धनंजय काळभोरांसह चारही उमेदवारांचा पदयात्रा आणि कार्यकर्त्यांच्या दुचाकी रॅलीतून घड्याळाचा जोरदार गजर

पिंपरी : प्रभाग क्रमांक १५, आकुर्डी गावठाण-गंगागनर-वाहतूकनगरी-नि
प्रभागातील प्रमुख रस्ते, वस्ती आणि चौकांमधून गेलेल्या या पदयात्रेत कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विजयाचा आत्मविश्वास हे चित्र स्पष्टपणे पाहायला मिळाले. “घड्याळाचा गजर, विकासाचा निश्चय”, “धनंजय कोळभोर आगे बढो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दुचाकी रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. घड्याळाच्या चिन्हाचे झेंडे, बॅनर आणि घोषणांनी प्रभागात निवडणुकीचा रंग चढला होता.
पदयात्रेदरम्यान धनंजय कोळभोर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत, “हा प्रचार जनतेच्या विश्वासाचा आहे. प्रभाग १५ मधील विकास, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याची माझी ठाम भूमिका आहे,” असे सांगितले.
संपूर्ण प्रचार काळात घराघरांत संपर्क, प्रश्नांवर स्पष्ट भूमिका, कार्यकर्त्यांची मजबूत फळी यामुळे धनंजय कोळभोर यांना प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात यश आले आहे, अशी भावना कार्यकर्ते आणि नागरिक व्यक्त करत आहेत. मंगळवारी प्रचाराची सांगता झाली असली, तरी घड्याळाचा गजर, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक १५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाला भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. आता केवळ मतदानाचा दिवस बाकी असून, गुरूवारी मतदानादिवशी प्रभाग १५ मध्ये घड्याळाचा गजर मतपेटीत उमटणार, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.



