बॅनर न्यूज

जागा विक्रीच्या नावाखाली भोसरीतील अझहर खान याच्याकडून तिघांची लाखोंची फसवणूक

आरोपीविरोधात पोलिस आयुक्तांकडे तक्रार; गुन्हा दाखल करून पैसे परत मिळवून देण्याची नागरिकांची मागणी

Spread the love

पिंपरी : वडमुखवाडी येथील एका जागेच्या विक्रीचे हक्क माझ्याकडे असल्याचे भासवून तिघांची तब्बल १६ लाख ४२ हजार रुपयांची एकाने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या तीनही व्यक्तींनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याकडे अर्ज करून न्याय देण्याची मागणी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे फसवणूक केलेल्या व्यक्तीने अशाच प्रकारे एका महिलेची फसवणूक केल्याने त्याच्यावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा प्रकार वडमुखवाडी येथे घडला.

अझहर सिकंदर खान (रा. दिघी रोड, भोसरी) असे लोकांची जागा विक्रीतून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर एका महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर दिघी पोलीस ठाण्यात आधीच एक गुन्हा दाखल आहे. वडमुखवाडी सर्व्हे क्रमांक ९१, हिस्सा क्रमांक १ ही जागा तस्नीम पुनावाला याच्या मालकीची आहे. परंतु आरोपी अझहर खान याने या जागेचे स्वामित्व स्वतःकडे असल्याचे दर्शविणारी बनावट कागदपत्रे तयार केली. ही कागदपत्रे ज्ञानेश्वर करडे, अमर अत्तार आणि शेखर पावशे यांना दाखवून जागा विक्री करणार असल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून ज्ञानेश्वर करडे, अमर अत्तार आणि शेखर पावशे या तिघांनीही एकूण १९ लाख ६२ हजार रुपये आरोपी अझहर खान याला दिले. मात्र या आरोपीने यातील केवळ ३ लाख २० हजार रुपये जागेच्या मूळ मालकिणीला देऊन उर्वरित एकूण १६ लाख ४२ हजार रुपयांचा अपहार केला आहे.

है पेसे घेतल्यानंतर आरोपीने ज्ञानेश्वर करडे, अमर अत्तार आणि शेखर पावशे या तिघांनाही लवकरच जागेचे खरेदीखत करून देण्याचे आश्वासन दिले. गेल्या चार वर्षापसून हे तीनही नागरिक आरोपी अझहर खान याच्याकडे खरेदीखत करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करत आहेत. मात्र आरोपी अझहर खान हा नेहमी टाळाटाळ केली. तसेच या तिघांच्याही सततच्या पाठपुराव्यामुळे वैतागलेल्या आरोपी अझहर खान याने या तिघांनाही पैसे परत मागितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे या तिघांनीही पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आणि दिघी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार अर्ज दिला आहे. स्वामित्व हक्काची बनावट कागदपत्रे तयार करणे, आर्थिक फसवणूक करणे आणि गुन्हेगारी कट रचून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी अझहर खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ज्ञानेश्वर करडे, अमर अत्तार आणि शेखर पावशे या तिघांनीही पोलिस आयुक्त यांच्याकडे केली आहे. तसेच आरोपी अझहर खान याने आमची फसवणूक करून घेतलेली रक्कम आम्हाला परत मिळावी आणि या आरोपीकडून जिवाला धोका असल्यामुळे पोलीस संरक्षणही देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे. त्याचप्रमाणे आरोपी अझहर खान याच्यासोबत जागेशी संबंधित कोणताही व्यवहार करू नये, असे आवाहनही या तिघांनी नागरिकांना केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button