मावळ

श्रीमंत छत्रपती राजे प्रतिष्ठानच्या लोणावळा शहराध्यक्षपदी जॉन जोसेफ

खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रतिष्ठानमध्ये मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Spread the love

पिंपरी : श्रीमंत छत्रपती राजे प्रतिष्ठानच्या लोणावळा शहराध्यक्षपदी जॉन विलियम जोसेफ यांची निवड करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक तथा भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सामाजिक कार्यात सक्रिय योगदान देण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद गायकवाड यांनी जॉन जोसेफ यांना निवडीचे पत्र दिले आहे. जॉन जोसेफ यांच्या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

जॉन जोसेफ यांनी लोणावळा शहरात सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांची श्रीमंत छत्रपती राजे प्रतिष्ठानच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे श्रीमंत छत्रपती राजे प्रतिष्ठानचे संस्थापक आहेत. श्रीमंत छत्रपती राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
या प्रतिष्ठानचे कार्य लोणावळा शहरात अधिक व्यापक करण्याच्यादृष्टीने जॉन जोसेफ यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवडीमुळे लोणावळा शहरात प्रतिष्ठानच्या कार्याला नवी दिशा आणि गती मिळेल. शहरातील नागरिकांच्या विविध स्तरांवरील समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देणे, विविध सामाजिक उपक्रम राबविणे तसेच तरुणांना सामाजिक कार्यात सहभागी करून घेण्यावर भर देणार असल्याचे जॉन जोसेफ यांनी सांगितले.
Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button