पिंपरी चिंचवड
महाशिवरात्रीनिमित्त चिंचवड येथे रविवारी मोफत ध्यान महोत्सवाचे आयोजन

पिंपरी : पीएमसी वर्ल्डच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त रविवारी मोफत महाशिवरात्री ध्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवडगाव येथील चिंचवडे लॉन्समध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे रविवारी १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच ते सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत हा ध्यान महोत्सव होणार आहे. शारीरिक आरोग्य, बुद्धीचा विकास, मनःशांती आणि आत्मसाक्षात्कारासाठी हा ध्यान महोत्सव महत्त्वाचे ठरणार आहे. सिनियर पिरॅमिड मास्टर्स यांच्या मार्गदर्शनाखाली हा ध्यान महोत्सव घेतला जाणार आहे. या महोत्सवात विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. या महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिवभक्तांनी 9923360175, 9373066286, 9324786406, 7304374595, 9764000159 किंवा 9822977113 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



