बॅनर न्यूज
पिंपरी मतदारसंघाच्या निवडणुकीत १५ उमेदवार; अण्णा बनसोडे, सुलक्षणा शिलवंत-धर आणि मनोज गरबडे यांच्यात तिरंगी लढत होणार
पिंपरी : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत पिंपरी विधानसभा मतदारसंघातून एकूण २१ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण १५ उमेदवार उरले आहेत. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत-धर आणि वंचित बहुजन आघाडीचे मनोज गरबडे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
पिंपरी मतदारसंघासाठी एकूण ३६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून गौतम चाबुकस्वार, चंद्रकांता सोनकांबळे, काळूराम पवार, जितेंद्र नानावरे, रीता सोनवणे, बाबा कांबळे, दीपक रोकडे, सुरेश लोंढे, प्रल्हाद कांबळे, कृष्णा कुडूप, चंद्रकांत लोंढे, नवनाथ शिंदे, स्वप्नील कांबळे, मनोज कांबळे, दादाराव कांबळे, मयूर जाधव, मुकुंद ओव्हाळ, जफर चौधरी, सुधीर कांबळे, हेमंत मोरे यांनी आपले अर्ज मागे घेतले.
त्यामुळे आता या मतदारसंघात अण्णा बनसोडे, सुलक्षणा शिलवंत-धर, मनोज गरबडे, सुंदर कांबळे, बाळासाहेब ओव्हाळ, राजेंद्र छाजछिडक, राहुल सोनवणे, कैलास खुडे, नरसिंग कटके, भिकाराम कांबळे, मीना खिलारे, राजू भालेराव, सचिन सोनवणे, सुधीर जगताप, सुरेश भिसे हे १५ उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत. यातील अण्णा बनसोडे, सुलक्षणा शिलवंत-धर आणि मनोज गरबडे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.