खान्देश मराठा मंडळातर्फे विविध संस्थाना ब्लँकेट वाटप
पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथील खान्देश मराठा मंडळ दरवर्षी विविध सामाजिक संस्थांना ब्लँकेट वाटप करत असते. थंडीची चाहूल लागल्यामुळे मंडळाने आळंदी येथील श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था व हडपसर येथील सिद्धी वृध्दाश्रम येथे मुलांना व वृद्धांसाठी ब्लँकेट वाटप केले.
रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था व सिद्धी वृध्दाश्रम येथे खान्देश मराठा मंडळाचे मधुकर पगार, उपाध्यक्ष सयाजीराव पाटील, संचालक मिलिंद पाटील, सचिव प्रदीप शिंदे, सहसचिव अनिल सावंत, सुरेश पाटील, एकनाथ अहिरे, बी.डी. पाटील, कृष्णराव अहिरराव व श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे मोहन महाराज शिंदे, नरहरी महाराज चौधरी उपस्थित होते. १३० मुलांसाठी खान्देश मराठा मंडळातर्फे ब्लँकेट वाटप करण्यात आले.
खान्देश मराठा मंडळ प्रत्येकवर्षी वंचित आनाथ, वृद्धाश्रमाला एक हात मदतीचा दिला जातो. तसेच गरीब गरजू, कष्टकरी, शेतकरी कुटुंबाच्या विवाहासाठी अनेक उपक्रम मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी राबवले जातात. खान्देश मराठा मंडळ २०० पेक्षा जास्त ब्लँकेटचे वाटप करणार आहे.