बॅनर न्यूज

जितेंद्र आव्हाडांसारखी मनोवृत्ती ठेचलीच पाहिजे – शंकर जगताप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडल्याच्या निषेधार्थ पिंपरीत भाजपचे आंदोलन

Spread the love

पिंपरी : जितेंद्र आव्हाड ही एक प्रकारची मनोवृत्ती आहे. अशा मनोवृत्ती जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा मनोवृत्ती महापुरूषांचा वेळोवेळी अवमान करण्याची परंपरा निर्माण करत आहेत. यापूर्वीही आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तसेच प्रभू श्रीराम आणि महिलांबद्दलही अपशब्द वापरले होते. वारंवार असे वागणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या मनोवृत्ती ठेचल्याच पाहिजेत, अशी आक्रमक भूमिका भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी गुरूवारी घेतली.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्यावर मनुस्मृती दहनाचे आंदोलन करताना भारतरत्न आणि संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडले. त्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने गुरूवारी आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला भाजपने जोडे मारले. त्यावेळी शंकर जगताप बोलत होते. यावेळी माजी खासदार अमर साबळे, भाजपच्या दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, शहराचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, सरचिटणीस शैला मोळक, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुजाता पालांडे, अनुसूचित जाती आघाडीचे शहराध्यक्ष भीमा बोबडे, माजी नगरसेवक सागर आंगोळकर, बाबासाहेब त्रिभुवन, धनराज बिर्दा, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, वैशाली खाड्ये गोगावले आदी उपस्थित होते.

शंकर जगताप म्हणाले, “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जातीभेद नष्ट करण्यासाठी चवदार तळ्याचे आंदोलन केले. अशा या महामानवाचा त्याच जागेत अवमान करण्याचे पाप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून आव्हाड यांनी आपल्यातील खऱ्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे. त्यांचा महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेच्या वतीने आम्ही निषेध करत आहोत.

या कृत्याने आव्हाडांच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून येते. त्यामुळे स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्यांचा बुरखा फाटला आहे. तसेच लोकसभा निवडणूक प्रचारात भाजपा संविधान बदलणार अशी आरोळी ठोकलेल्या विरोधकांचाही चेहरा समोर आला आहे. जितेंद्र आव्हाड यांची आमदारकी रद्द व्हायला हवी. ते समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे घातक कृत्य वारंवार करत आहेत. त्यामुळे त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button