बॅनर न्यूज
राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहर संपर्कप्रमुखपदी भरत महानवर यांची निवड

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष भरत महानवर यांच्या पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांची आता पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, व पक्षाचे मुख्य महासचिव माऊली सलगर यांच्या मार्गदर्शनानुसार पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य तानाजी शिंगाडे यांनी भरत महानवर यांना निवडीचे पत्र दिले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे पिंपरी-चिंचवडमध्ये संघटन वाढविण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून मी करत आहे. त्याची दखल घेऊन माझी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड केल्याबद्दल मी पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो. तसेच पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून या दोन्ही शहरात संघटन वाढीसाठी आणखी जोमाने काम करणार असल्याचे भरत महानवर यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.