पिंपळे सौदागरमध्ये देशी वृक्षांचे रोपण
चिंचवड: आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पिंपळे सौदागर मध्ये अडीचशे वृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरण संरक्षण गतीविधी, पिंपळे सौदागर नगर व एन्व्हायरमेंट कंजर्वेशन असोसिएशन (ECA)यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथील नक्षत्र वनात वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम घेण्यात आला. सैन्य दलाच्या व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला. देशी प्रजाती वड, पिंपळ,कडुनिंब, औदुंबर, नारळ यासह विविध देशी अशी सुमारे अडीचशे रोपे लावण्यात आली. यावेळी विविध संस्थांचे मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. राहुल मुंगीकर यांनी देशी प्रजातीची वृक्ष लावण्याचे महत्त्व सांगून लोकांना उपस्थित त्यांना पर्यावरण संवर्धनाचे काम सजगपणे करण्यासाठी आवाहन केले.
या कार्यक्रमात पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, पिंपरी, चिंचवड, काळेवाडी, पिंपळे निलख या भागातील पर्यावरण प्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला पुढील सात वर्ष या जागेवर वृक्षसंवर्धन रोपवाटिका सघन वन देवराई शेततळे असे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण जागृतीचे काम केले जाणार आहे.
कार्यक्रमाला ई सी ए संस्थेच्या विनिता दाते, पर्यावरण संरक्षण गतीविधीचे डॉ.दीपक शेंडकर अन्य कार्यकर्ते तसेच पिंपरी चिंचवड उद्यान विभागासह संस्थांचे पदाधिकारी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.