बॅनर न्यूज

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या अध्यक्षपदी गोविंद जगदाळे

Spread the love

पिंपरी : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या अध्यक्षपदी गोविंद जगदाळे, तर सचिवपदी सुभाष वाल्हेकर यांची निवड करण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या संचालक मंडळाचा आठवा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला. त्यावेळी जगदाळे व वाल्हेकर यांनी पदभार स्वीकारला.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल शीतल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (२६-२७) नितीन ढमाले यांच्या अध्यक्षतेखाली हा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी क्लबच्या वर्षभरातील विविध सामाजिक प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. मागील सात वर्षांपासून रोटरीच्या ध्येय धोरणानुसार क्लब सातत्याने उत्तम कामगिरी करीत आहे. काळाची गरज ओळखून पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायीनी पवनानदी संवर्धनासाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी सातत्याने विविध पर्यावरणपूरक सामाजिक प्रकल्प राबवत जनजागृती करीत आहे. हे काम अतिशय उल्लेखनीय आहे. क्लब रोटरीच्या विविध फोकस एरिया अंतर्गत सामाजिक बदल घडविण्यास महिला सबलीकरण, आरोग्य, युवकांना स्किल बेस ट्रेनिंग, हॅप्पी स्कूल असे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत, असे गौरवोद्धगार नितीन ढमाले यांनी काढले. रोटरीचे नियोजनबद्ध काम दूरगामी परिणाम करणारे आहे. त्यामुळे समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी तन मन आणि धनाने रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी बरोबर जोडले जावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी माजी अध्यक्ष सुधीर मरळ यांनी मागील वर्षात केलेल्या नदी संवर्धन, पर्यावरण, रायला, स्किल हब, हॅप्पी स्कूल, आनंदाची दिवाळी अश्या विविध सामाजिक प्रकल्पांचा आढावा मांडला. मावळते सचिव रामेश्वर पवार यांनी आपल्या कामाचा रिपोर्ट सादर केला. नवनियुक्त अध्यक्ष गोविंद जगदाळे यांनी येत्या काळात करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि क्लबची ध्येय धोरणे मांडली.

भरत चव्हाण (व्हाईस प्रेसिडेंट), प्रदीप वाल्हेकर (मेम्बरशीप), सचिन खोले (प्रोजेक्ट डायरेक्टर), गणेश बोरा (क्लब अडमिन), सुधीर मरळ (पब्लिक इमेज), अमर शेळके (फौंडेशन), तन्मय वाल्हेकर (ट्रेझरार), संदीप भालके (युथ), रोहिणी शिंदे (लिटरसी), सोमनाथ हरपुडे (क्लब ट्रेनर), रोहन वाल्हेकर (मेडिकल), रुपेश मुनोत (NGSE), शेखर चिंचवडे (डायरेक्टर पर्यावरण), वसंत ढवळे (डायरेक्टर हॅपी स्कूल), संदीप वाल्हेकर (आपत्कालीन व्यवस्थापन) स्वाती प्रदीप वाल्हेकर (डायरेक्टर हॅपी व्हिलेज), प्रणाली हरपुडे (डायरेक्टर इव्हेंट), स्वाती सुनील वाल्हेकर (महिला सबलीकरण), रेश्मा बोरा (डायरेक्टर वॉश), रसिका वाल्हेकर (पब्लिकेशन), अनुजा मरळ (आयटी), डॉ. मोहन पवार (मेडिकल चेयरमन), आबा जाधव (हॅप्पी स्कूल चेयरमन), रामेश्वर पवार (सार्जंट ऑफ आर्म्स), मनोज दगडे (सीएसआर), राहुल मुनोत (चेयरमन इव्हेंट), निलेश मरळ (चेयरमन हॅपी व्हिलेज), अतुल क्षिरसागर (चेयरमन पब्लिकेशन), राजेंद्र चिंचवडे (इंव्होयरॉनमेंट चेयरमन) यांनीही पदभार स्वीकारला.

शशांक भूमकर, गोविंद चितोडकर, जयश्री भामरे यांनी नवीन रोटरी सदयसत्वाची शपथ ग्रहण केली. माढा येथून भोगेवाडी शाळेतील शिक्षक उपस्थित होते. तसेच ज्योती भालके, अनिल नेवाळे, रवींद्र भावे, अशोक शिंदे, अमोल शहाणे, महापालिका शाळेतील शिक्षक तिकोने दाम्पत्य यांचीही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. सचिन खोले यांनी सूत्रसंचालन केले. भरत चव्हाण यांनी आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button