बॅनर न्यूज

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी-चिंचवड शहरतर्फे सलग सहाव्या वर्षी १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Spread the love

पिंपरी : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी-चिंचवड शहर यांच्यातर्फे सलग सहाव्या वर्षी १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे यशस्वीरीत्या आयोजन काशिधाम मंगल कार्यालय चिंचवड येथे करण्यात आले होते. शहराच्या विविध भागांमधून सुमारे १५० विद्यार्थी आणि त्यांचे पालक असे जवळपास ५०० लोक या कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला आघाडीच्या विशेष प्रयत्नातून ५ हुशार व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि प्रशिस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीचे प्रमुख निशिकांत पटवर्धन यांना ब्रम्हभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारातील सन्मान पत्राचे वाचन ऋजुता कुलकर्णी हिने केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक सुरेश भोईर, अश्विनी चिंचवडे उपस्थित होते.  तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ प्रदेश पदाधिकारी दिलीप कुलकर्णी, राजन बुडुख, पुष्कराज गोवर्धन, संजय परळीकर, पवन वैद्य, पुणे शहराध्यक्ष श्री.मंदार रेडे आणि महिला अध्यक्ष, केतकी कुलकर्णी, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी कार्याध्यक्ष महेश बारसावडे, महिलाध्यक्ष सुषमा वैद्य, उपाध्यक्ष भाऊ कुलकर्णी, सरचिटणीस आनंद देशमुख, राहुल कुलकर्णी, शामकांत कुलकर्णी, कोषाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, उद्योजक आघाडी अध्यक्ष कार्तिक गोवर्धन, ब्रह्मोद्योग चे शहराध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, ब्रह्मोद्योग सरचिटणीस मकरंद कुलकर्णी, सचिव प्रवीण कुरबेट, वैभव खरे ब प्रभाग अध्यक्ष अभय कुलकर्णी, महिला आघाडी उपाध्यक्ष संध्या कुलकर्णी, वैशाली कुलकर्णी, महिला सरचिटणीस आरती कोसे, महिला सचिव सुनिधी वडगावकर महिला कार्यकारिणी सदस्य संगीता कुलकर्णी, अनिता कुलकर्णी, स्मिता अकोलकर, नेहा टिकले, मनीषा कुलकर्णी, ऋजुता कुलकर्णी हे उपस्थित होते.

या कार्यक्रमात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने चिंचवड विधानसभा निरीक्षक म्हणून महेश बारसावडे यांची तर शहर उपाध्यक्षपदी भूषण दिलीप जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचा सन्मान शहर कार्यकारिणीतर्फे करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभय कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, महेश बारसावडे, शामकांत कुलकर्णी, आनंद देशमुख, सुषमा वैद्य आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कुलकर्णी यांनी केले. राहुल कुलकर्णी आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button