पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी धम्मराज साळवे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी धम्मराज साळवे यांची निवड करण्यात आली आहे. साळवे यांनी एमआयएमच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. आता त्यांची पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी धम्मराज साळवे यांना निवडीचे पत्र दिले.
निवडीनंतर बोलताना धम्मराज साळवे म्हणाले, “शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. यापुढील काळात पक्ष विस्तारासाठी शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या साथीने कार्यरत राहून शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीत पक्षाची सत्ता आणण्यासाठी पूर्ण ताकदीने कार्य करणार आहे.”
शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले, “धम्मराज साळवे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाने एक युवा अभ्यासू वक्ता, संघटन कौशल्य व सामाजिक जाण असलेला आंबेडकरी चळवळीतील चेहरा पक्षाला मिळाला आहे. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वरिष्ठ उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्यामुळे पक्षाला निश्चित बळ मिळेल.