राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी २६ ठिकाणी पथसंचलन होणार
हजारो स्वयंसेवक सहभागी होणार; संघ शताब्दी वर्षाची सुरुवात

पिंपरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी निमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील विविध २६ ठिकाणी पथसंचलन करण्यात येणार आहे. नियोजित मार्गावर संघ गणवेशातील स्वयंसेवकांचे सदंड भव्य पथसंचलन निघणार आहे. घोषाच्या तालावर हे संचलन होणार आहे. यंदा संघ शताब्दी वर्षात प्रवेश करत असल्याने पथसंचलनांना एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. संघ स्वयंसेवकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रमुख अतिथी संचलनात सहभागी होणार आहेत. या पथसंचलनात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी केले आहे.
विविध भागातील पथसंचलन स्थान व वेळ –
नगर : देहू
वेळ : सायं.४.३० वाजता
स्थान : विठ्ठल मंदिर, विठ्ठलवाडी, देहू
नगर : देहूरोड
वेळ : सकाळी ८.३० वाजता
स्थान : व्हिडीआर मैदान, मामुर्डी
नगर : निगडी
वेळ : सकाळी ०७:२५
स्थान : रुपीनगर, सहयोगनगर
नगर : संभाजी नगर
वेळ : सकाळी ७ वाजता
स्थान : विठ्ठल मंदिर समोरील मैदान, राजे शिवाजी नगर
नगर : चिखली
वेळ : सकाळी ०७:३०
स्थान : म्हेत्रे उद्यान समोर, म्हेत्रे साने वस्ती रोड, म्हेत्रे वस्ती
नगर : दिघी
वेळ – दुपारी ४.३० वाजता
स्थान : माणिक पार्क सोसायटी समोरील मैदान, बोपखेल
नगर : मोशी
वेळ : सायं.४.३०
स्थान : न्यू इंद्रायणी शाळा, शिवाजीवाडी
नगर : आळंदी
वेळ : सकाळी ७:३० वाजता
स्थान : नानाश्री लॉन्स प्रांगण, मरकल रस्ता, आळंदी
नगर : चऱ्होली
वेळ : सायं ४.३० वाजता
स्थान : किड्स पराडाईज शाळा, काळे कॉलनी
नगर : भोसरी
वेळ : सकाळी ७.३० वाजता
स्थान : शिवाजी महाराज विद्यालय, भोसरी
नगर : इंद्रायणी नगर
वेळ : सायं. ०४:०० वाजता
स्थान : सुंधा माता मंदिराजवळ, खान्देश नगर, इंद्रायणी नगर
नगर : संत तुकाराम नगर
वेळ : दुपारी ४.३०
स्थान : बालभवन शाळा, खराळ आई मंदिर जवळ, खराळवाडी, पिंपरी
नगर : कासारवाडी
वेळ : सकाळी ७.३० वाजता
स्थान : आई माताजी कुंदन नगर
नगर : सांगवी
वेळ : सकाळी ८:३०
स्थान : स्व.वसंत दादा पुतळा, शेवटचा बस स्टॉप, प्रियदर्शनी नगर, जुनी सांगवी
नगर : पिंपळे गुरव
वेळ : सकाळी ०७:३०
स्थान : राजमाता जिजाऊ उद्यान, पिंपळे गुरव
नगर : पिंपळे सौदागर
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा
नगर : पिंपळे निलख
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : हॉटेल रंगला पंजाब जवळ, डि. पी. रोड, विशाल नगर
नगर : काळेवाडी – रहाटणी
वेळ : सकाळी ७.१५ वाजता
स्थान : १५ एम स्ट्रीट सोसायटी शेजारी मैदान, रहाटणी मेन रोड
नगर : पिंपरी
वेळ : सकाळी ०७ वाजता
स्थान : साधू वासवानी उद्यान शेजारी, पिंपरी काळेवाडी पुलाजवळ
नगर : चिंचवड पूर्व
वेळ : सकाळी ०७:००
स्थान : झेंडा चौक जवळ, एम्पायर इस्टेट, जुना मुंबई पुणे मार्ग
नगर : चिंचवड पश्चिम
वेळ : सकाळी ६.४५ वाजता
स्थान : स्वामी समर्थ केंद्र
नगर : वाकड-थेरगाव
वेळ : सकाळी ०७ वाजता
स्थान : बापूजी बुवा उद्यान समोर, थेरगाव
नगर : पुनावळे
वेळ : सकाळी ०७ वाजता
स्थान : स्तांझा सोसायटी समोर, पांढरे वस्ती
नगर: हिंजवडी
वेळ: ७.३० वाजता
स्थान: संग्रीया सोसायटी गेट, मेगापोलीस, मान, हिंजवडी
नगर : रावेत
वेळ : सकाळी ०७:०० वाजता
स्थान : ओम चौक, हनुमान स्वीट, बिजली नगर
नगर : आकुर्डी
वेळ : सकाळी ०७ वाजता
स्थान : सूर्यमुखी मारुती मंदिराजवळ, काचघर चौक, सेक्टर २४, प्राधिकरण