मी सेवेकरी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २०० जणांचे रक्तदान
स्वातंत्र्यदिनानिमित्त मी सेवेकरी फाउंडेशनचा उपक्रम

पिंपरी : देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सेवेकरी फाऊंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात २०० हून अधिक जणांनी रक्तदान केले.
मी सेवेकरी फाऊंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त खेड तालुक्यातील कोयाळी, रेटवडी आणि मरकळ या तीन गावांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ मुंगसे तसेच मरकळ, कोयाळी व रेटवडी गावातील सरपंच, उपासरपंच, मा. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुधीर मुंगसे म्हणाले, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान केल्याने जीवन वाचविण्याचे पुण्य मिळते. याचे कोणतेही मोल करता येत नाही. त्यामुळे वर्षातून किमान ३ ते ४ वेळा रक्तदान करायला हवे. या रक्तदान शिबिरासाठी अक्षय ब्लड बँक, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.