पिंपरी चिंचवड

भाजपच्या दीपक भोंडवे यांना किवळेवासीयांचा भरघोस प्रतिसाद

विकासाच्या हाकेला नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा

Spread the love

पिंपरी : रावेत-किवळे-मामुर्डी, प्रभाग क्रमांक १६ मधील भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार दीपक भोंडवे यांच्या प्रचाराला किवळे परिसरात गेल्या चार दिवसांपासून प्रचंड जनसमर्थन लाभत असून घरोघरी, गल्लोगल्ली आणि चौकाचौकात किवळेवासीयांनी त्यांचे जाहीर स्वागत करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. “विकास, विश्वास आणि कार्यक्षम नेतृत्व” या मुद्द्यांवर आधारित प्रचाराने दिपक भोंडवे यांनी नागरिकांच्या मनात ठाम स्थान निर्माण केले आहे.

किवळे परिसरात सलग सुरू असलेल्या प्रचारादरम्यान दीपक भोंडवे यांनी बुधवारी तरसवस्ती, श्रीनगर, नेटके कॉलनी, बापदेवनगर, सिद्धीविनायक कॉलनी परिसरातील नागरिकांशी घरोघरी जाऊन थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाच्या गरजा जाणून घेतल्या. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सुरक्षा, शिक्षण आणि रोजगार यासारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना राबवण्याचा विश्वास दिपक भोंडवे यांनी नागरिकांना दिला.

यावेळी नागरिकांनी, “काम करणारा नेता हवा”, “विकासासाठी सक्षम नेतृत्व आवश्यक आहे” अशा प्रतिक्रिया व्यक्त करत दीपक भोंडवे यांच्या कार्यशैलीवर विश्वास दाखवला. तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापारी वर्गाकडूनही दिपक भोंडवे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसून आला. किवळेमधील महिलांनी दिपक भोंडवे यांचे घरोघरी औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. भाजप सरकारच्या विकासकामांचा आढावा घेताना दीपक भोंडवे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती देत त्या योजनांचा थेट लाभ किवळेवासीयांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. “राजकारण नव्हे, तर विकास हेच माझे ध्येय आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी नागरिकांसमोर मांडले.

एकूणच किवळे परिसरात भाजपच्या दीपक भोंडवे यांच्या प्रचाराला मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहता महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजपच्या विजयाचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये दुणावला असून, किवळेकरांनी परिवर्तनाचा स्पष्ट कौल दिल्याचे चित्र दिसत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button