पिंपरी चिंचवड

प्रभाग क्रमांक १६ मध्ये लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत एकच पसंती – दिपक भोंडवे!

भाजपचा किवळेत प्रचाराचा धडाका, दिपक भोंडवेंच्या पदयात्रेला जनसमर्थन उसळतेय

Spread the love

पिंपरी : रावेत-किवळे-मामुर्डी, प्रभाग क्रमांक १६ मधील किवळे परिसरात भाजपच्या दिपक भोंडवे यांनी प्रचाराचा अक्षरशः धडाका लावत संपूर्ण परिसर पिंजून काढला आहे. त्यांना गल्लीबोळातून, चौकाचौकातून आणि घराघरांतून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता “लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत एकच नाव – दिपक भोंडवे” अशीच भावना नागरिकांमध्ये उमटताना दिसत आहे.

भाजपच्या विकासनिष्ठ धोरणांवर विश्वास ठेवत नागरिकांनी दिपक भोंडवे यांच्या प्रचाराला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थिती लावत असल्याचे चित्र आहे. त्यांनी महिलांपासून युवकांपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांपासून व्यापाऱ्यांपर्यंत सर्व स्तरातील मतदारांशी थेट संवाद साधत त्यांचे प्रश्न, अपेक्षा आणि आशा जाणून घेतल्या. प्रत्येक घरासमोर मिळणारे प्रेमळ स्वागत, हातात हात घालून दिलेले पाठबळ आणि “दीपक भोंडवे आगे बढो”च्या घोषणा यामुळे संपूर्ण किवळे परिसरात भाजपसाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“विकास, विश्वास आणि कार्यक्षम नेतृत्व” या त्रिसूत्रीवर आधारित प्रचार करत दीपक भोंडवे यांनी नागरिकांच्या मनात प्रचंड विश्वास निर्माण केला आहे. रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांबाबत ठोस भूमिका मांडत त्यांनी काम बोलतं हेच पुन्हा एकदा अधोरेखित केले. प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड उत्साह असून दिपक भोंडवे यांच्यासाठी संघटित ताकदीने प्रचार यंत्रणा वेगाने काम करत आहे. त्यामुळे किवळेत सध्या एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे “दिपक भोंडवे म्हणजे विकासाची खात्री!” त्यातून ताई माई आक्का दिपक भोंडवे यांच्या नावासमोरील कमळ चिन्हावर मारा शिक्का असाच घोष सध्या संपूर्ण किवळे परिसरात ऐकायला मिळत असल्याचे चित्र आहे.

एकूणच, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेल्यापासून भाजपचे दिपक भोंडवे यांनी आपल्या प्रभाग क्रमांक १६ मधील किवळे परिसरात प्रचाराचा धडाका लावला आहे.  त्यांच्या प्रचारार्थ काढण्यात येणाऱ्या पदयात्रांमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचत असल्याचे पाहायला मिळत आहे. किवळे परिसरात भाजपचा प्रचार दिवसेंदिवस अधिक भक्कम होत असून, दीपक भोंडवे यांच्या बाजूने जनमत स्पष्टपणे झुकत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्या प्रचाराचा धडाका आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता प्रभाग क्रमांक १६ मधील निवडणुकीच्या रणांगणात सध्या ‘दिपक भोंडवे’ या एकाच नावाचा जयघोष घुमत आहे.

दिपक भोंडवेंचा विकासाच्या मुद्द्यावर भर

यावेळी बोलताना दीपक भोंडवे म्हणाले की, “प्रचारात किवळेकरांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे. गेल्या काही वर्षांत लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात झालेल्या विकासकामांची पावती म्हणून नागरिक भाजपला पसंती देत आहेत. प्रभाग क्रमांक १६ मधील रस्ते, पाणी आणि सुरक्षिततेचे प्रश्न सोडवण्यास माझे सर्वोच्च प्राधान्य असेल.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button