भाजपच्या दिपक भोंडवे यांचा वाल्हेकरवाडीत झंझावाती प्रचार
घरोघरी जाऊन साधला मतदारांशी संवाद

पिंपरी : प्रभाग क्रमांक १६, रावेत-किवळे-मामुर्डी-वाल्हेकरवाडीमधील भाजपचे उमेदवार दिपक भोंडवे यांनी वाल्हेकरवाडी परिसरात पदयात्रा काढून तसेच नागरिकांच्या घरोघरी जाऊन संपर्क साधत प्रचाराचा धडाका लावला आहे. ‘घरोघरी दीपक भोंडवे’ या मोहिमेअंतर्गत त्यांनी वाल्हेकवाडी, गुरूद्वारा, शिंदेवस्ती आणि परिसरातील स्थानिक नागरिकांच्या त्यांनी भेटी घेतल्या आणि त्यांच्या समस्या जाणून घेत विकासाचे व्हिजन मांडले.
भाजपचे उमेदवार दिपक भोंडवे यांची पदयात्री वाल्हेकरवाडीत दाखल होताच ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. घरोघरी महिलांनी त्यांचे औक्षण केले, तर ज्येष्ठांनी त्यांना विजयाचा आशिर्वाद दिला. परिसरातील तरुणांचा उत्साह यावेळी ओसंडून वाहत होता. “आपला माणूस, हक्काचा माणूस” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
यावेळी मतदारांशी संवाद साधताना भाजपचे उमेदवार दिपक भोंडवे म्हणाले, “वाल्हेकरवाडीसह रावेत, किवळे आणि मामुर्डीचा सर्वांगीण विकास हेच माझे मुख्य ध्येय आहे. रस्ते, पाणी, आणि पायाभूत सुविधांसोबतच स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. गेल्या काही वर्षांत या प्रभागात कामांची गती मंदावलेली आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भारताला महासत्ता बनविण्याच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. त्यांनी या देशात विकासाची गंगा पोहोचविण्याचे काम केले आहे. त्यांचे हात आणखी बळकट करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला विजयी करण्यासाठी प्रभाग क्रमांक १६ मधील मतदारांनी पुढाकार घ्यावा. प्रभाग क्रमांक १६ मध्ये विकासकामांची आणि सर्वसामान्यांच्या प्रगतीची गती अधिक वाढवण्यासाठी मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे. महापालिका निवडणुकीत भाजपला मतदान करून हा आशिर्वाद मला द्यावा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.”
पदयात्रेची प्रमुख वैशिष्ट्ये:
- थेट संवाद: भोंडवे यांनी कोणत्याही औपचारिकतेशिवाय थेट नागरिकांच्या घरात जाऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या.
- महिलांचा सहभाग: प्रचारात महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती.
- स्थानिक प्रश्न: पदयात्रेदरम्यान त्यांनी वाल्हेकरवाडीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले.
या पदयात्रेत भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महायुतीचे घटक पक्षांचे नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाल्हेकरवाडीतील या अभूतपूर्व प्रतिसादानंतर प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजपच्या दीपक भोंडवे यांचे पारडे जड असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.



