बॅनर न्यूज
पिंपरी-चिंचवडमधील एमआयएमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील एमआयएमच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात रविवारी प्रवेश केला. शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे यांच्या पुढाकाराने एमआयएमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. त्यामध्ये एमआयएमचे भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, शहर उपाध्यक्ष हाफिज अबूबकर, मनीषा वाघमारे, राज जेठीथोर, जितेंद्र वाघमारे, मुफ्ती अब्दुल बासित, मौलाना अताहार, मालती बनसोडे, शोभा भिसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात वारंवार होणारे महिलांवरील अत्याचार, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी, महागाई अशा अनेक समस्यांना सोडवायच्या असतील, तर शरद पवार यांच्याशिवाय पर्याय नाही. येणाऱ्या काळात प्रत्येक माणसापर्यंत, घराघरात शरद पवार यांचे विचार आम्ही पोहचवणार आहोत अशा भावना या सर्वांनी व्यक्त केल्या. यावेळी पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अल्ताफ शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.