मयूर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी विधानसभा मतदारसंघात महाआरोग्य शिबिर सप्ताहाचे आयोजन

पिंपरी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मयूर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी ‘महाआरोग्य शिबिर सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे.
२७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान हे शिबीर राबविण्यात येणार आहे. दापोडी येथील नरवीर तानाजी मालुसरे स्मारक येथे या शिबीराचे शुक्रवारी उद्घाटन होणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबीर सुरू असेल. पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक प्रभागात या शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. या शिबीरात नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात येतील. तसेच डोळे तपासणी, आरोग्य विषयक तपासणी, औषधांचे वाटप करण्यात येणार आहे.
या शिबीराबाबत मयूर जाधव म्हणाले, “पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी हे महाआरोग्य शिबीर सप्ताह राबविण्यात येत आहे. पिंपरी मतदारसंघ हा शक्तिशाली घडवण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. या मतदारसंघातील कोणताही व्यक्ती आरोग्यसेवेपासून वंचित राहू नये. नागरिकांच्या आरोग्याबाबतच्या समस्या सोडविण्यासाठी संपूर्ण मतदारसंघात हे शिबीर घेण्यात येत आहेय या शिबीरात अनेक तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांवर उपचार करणार आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले आहे.”