प्रभाग क्रमांक १२ मध्ये होम-टू-होम संवादातून नागरिकांचा अमोल भालेकरांच्या विजयाचा पक्का वादा
तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्ये मशालच्या विजयावर जनतेची अंतिम मोहोर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२, तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्
महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १२ मध्ये गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचारात प्रभागातील घराघरांतून, गल्लीबोळांतून आणि वस्तीवस्तीतून एकच संतप्त भावना व्यक्त होत आहे पाच वर्षांचे दुर्लक्ष, खोटी आश्वासने आणि अपयशी कारभार आता सहन होणार नाही. रस्ते, पाणी, ड्रेनेज, स्वच्छता, सुरक्षेचे प्रश्न मांडताना नागरिकांचा रोष स्पष्ट दिसत असून, जुने चेहरे आणि सत्ताधाऱ्यांविषयीचा संयम पूर्णपणे संपल्याचे चित्र आहे. याच रोषाला दिशा देत या प्रभागात मशाल चिन्हावर लढणारे अमोल भालेकर यांनी थेट जनतेशी संवाद साधत “हिशेब मागण्याची आणि बदल घडवण्याची हीच वेळ आहे” असा ठाम संदेश दिला आहे. कोणतीही दिखाऊ सभा नाही, कोणतेही पोकळ भाषण नाही, तर समस्या ऐकून घेणारा, उत्तर देणारा आणि कामाचा शब्द देणारा नेता म्हणून अमोल भालेकर प्रत्येक घरात पोहोचताना दिसत आहेत.
या होम-टू-होम प्रचारात नागरिकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “दिसणारे नव्हे, काम करणारे नेते हवेत!”, “फोटोसेशनचा कंटाळा आला, आता मशालच पेटणार!”. मशालच्या या प्रचारामुळे विरोधकांकडे मुद्दे नाहीत, काम नाही, उत्तर नाही, उरल्या आहेत फक्त अफवा आणि टीका, अशी स्थिती झाली आहे. मात्र प्रभाग क्रमांक १२ मधील जनतेने त्यालाही साफ नकार दिला आहे. संपूर्ण प्रभागात मशालच्या अमोल भालेकर यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नागरिकांनी अमोल भालेकरांच्या विजयाचा उघडपणे वादा केला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक १२ मध्ये बदलाची लाट थेट दारोदारी पोहोचली आहे. मशाल पेटली आहे, जनता पेटली आहे आणि अमोल भालेकरांच्या विजयाचा निर्णय आता प्रभाग क्रमांक १२ मध्ये अटळ ठरत चालला आहे.



