प्रभाग क्रमांक १६ मध्ये ‘केवळ कमळ… केवळ कमळ!’
रावेत–मामुर्डी–किवळेतील सोसायट्यांमध्ये दिपक भोंडवेच पसंतीचे उमेदवार

पिंपरी : प्रभाग क्रमांक १६ मधील रावेत, मामुर्डी आणि किवळे परिसरात सध्या एकच चित्र ठळकपणे दिसत असून, सोसायटी ते सोसायटी, मजला ते मजला फक्त कमळाचा नारा घुमत आहे. भाजपचे उमेदवार दिपक भोंडवे हेच या भागातील सुजाण, जागरूक आणि विकासाभिमुख मतदारांची पहिली आणि ठाम पसंती ठरत आहेत. त्यामुळे प्रभागात भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे.
प्रभाग क्रमांक १६ मधील हायराईज सोसायट्या, मध्यमवर्गीय वसाहती, नव्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये भाजपच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद स्पष्ट दिसत आहे. यावेळी भावनिक घोषणांना नाही, तर काम करणाऱ्या उमेदवाराला मत! पाणी, वाहतूक, पार्किंग, सुरक्षा, स्ट्रीट लाईट, कचरा व्यवस्थापन, सीसीटीव्ही आणि मूलभूत सुविधांवर भाजपचे उमेदवार दिपक भोंडवे यांनी मांडलेला ठोस अजेंडा सोसायटीवासीयांच्या थेट मनाला भिडत आहे. या प्रभागात कमळ हे येथे केवळ निवडणूक चिन्ह राहिलेले नाही, तर स्थिरता, विकास आणि विश्वासाचे प्रतीक बनले आहे. रावेत-मामुर्डी-किवळे परिसरात झालेला वेगवान शहरी विस्तार लक्षात घेता नियोजनबद्ध विकास, प्रशासकीय पकड आणि प्रभावी पाठपुरावा करणारा उमेदवार हवा, ही या प्रभागातील नागरिकांची स्पष्ट अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षांवर भाजपचे उमेदवार दिपक भोंडवे खरे उतरतील, असा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.
प्रचारादरम्यान सोसायट्यांमधील थेट संवाद, सभासदांसोबत चर्चा आणि प्रश्नांना मुद्देसूद उत्तरे देत भोंडवे यांनी ‘बोलघेवड्या राजकारणाला पूर्णविराम’ दिला आहे. त्यामुळे विरोधी उमेदवारांची भाषणे फिकी, तर त्यांचे दावे हवेत विरत असल्याचे चित्र आहे. अनेक सोसायट्यांमध्ये स्वयंप्रेरणेने उभारलेले कमळाचे फलक आणि उघड पाठिंबा हेच प्रभाग क्रमांक १६ मधील जनतेचा निर्णय जवळपास पक्का झाल्याचे संकेत देत आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक १६ मध्ये हवा पूर्णपणे कमळाच्या बाजूने वळली आहे. रावेत, मामुर्डी आणि किवळे येथील सोसायट्यांमध्ये भाजपचे दिपक भोंडवे हे केवळ उमेदवार नाहीत, तर विकासाचा ठाम पर्याय म्हणून पुढे आले आहेत. त्यामुळे या प्रभागात निकालाची दिशा आता स्पष्ट असून ‘केवळ कमळ… केवळ कमळ!’ हाच जनतेचा अंतिम निर्णय ठरत असल्याचे दिसत आहे.



