प्रभाग क्रमांक १२ मध्ये घरोघरी मशाल; माजी नगरसेवक व सत्ताधाऱ्यांचा खेळ खल्लास
अमोल भालेकरांच्या प्रचंड विजयाच्या रुपाने जनता सूड घेणार; ‘खोट्या विकासा’ची जनतेकडून थेट हकालपट्टी होणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२, तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध् ये निवडणूक प्रचारासाठी राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या प्रभागात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मशाल चिन्हावर लढणाऱ्या अमोल भालेकर यांच्या घरोघरी प्रचाराने निवडणूक रिंगणात असलेल्या माजी नगरसेवक आणि सत्ताधाऱ्यांचा खेळ अक्षरशः खल्लास झाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. संपूर्ण प्रभागात केवळ मशाल जोरात सुरू असून, वर्षानुवर्षे चाललेला तथाकथित विकासाचा बुरखा अमोल भालेकर यांच्याकडून फाडताना दिसत आहे. त्यांना प्रभागातील जनतेचाही भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने मशाल जोमात आणि बाकीचे कोमात अशी राजकीय स्थिती दिसत आहे.
प्रभाग क्रमांक १२ मधील रस्त्यांची दुरवस्था, पाणीटंचाई, तुंबलेली ड्रेनेज, कचऱ्याचे ढीग आणि दुर्लक्षित नागरी सुविधा या सगळ्या प्रश्नांवर मशाल चिन्हावर लढणाऱ्या अमोल भालेकर यांनी निवडणूक रिंगणात असलेल्या माजी नगरसेवक आणि सत्ताधाऱ्यांच्या कामांची अक्षरशः चिरफाड करत ‘खोट्या विकासाचा’ हिशेब जनतेसमोर दररोज प्रचारात मांडत आहेत . “पद होते, सत्ता होती, निधी होता, मग प्रभागातील काम कुठे गेलं?” असा थेट आणि तिखट सवाल अमोल भालेकर यांनी घरोघरी करत प्रचाराला आक्रमक धार दिली आहे.
अमोल भालेकर यांच्या या प्रचारादरम्यान नागरीकही निवडणूक रिंगणातील माजी नगरसेवक आणि सत्ताधारी भाजपवर उघडपणे आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. प्रभागाच्या निवडणूक रिंगणात असलेल्या माजी नगरसेवकांच्या कार्यकाळातील अपयशावर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी “फक्त बॅनर-फ्लेक्सपुरता विकास नको, प्रत्यक्ष काम हवं” अशी ठाम भूमिका जनता मांडताना दिसत आहे.
तरुणांचा रोष, महिलांचा ठाम नकार आणि ज्येष्ठ नागरिकांची बोचरी प्रतिक्रिया पाहता यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२ मध्ये खोट्या विकासाला जनता साफ फेटाळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मशाल चिन्हावर लढणारे अमोल भालेकर यांचा प्रचार हा केवळ निवडणुकीपुरता न राहता, निवडणूक रिंगणातील माजी नगरसेवक व सत्ताधाऱ्यांच्या अपयशाविरोधात उभा ठाकलेला थेट जनआंदोलन ठरत आहे.
“घरोघरी मशाल, खोट्या विकासाचा अंत” असे समीकरण प्रभाग क्रमांक १२ मध्ये पक्के झाले असून, निवडणूक रिंगणातील माजी नगरसेवक आणि सत्ताधाऱ्यांचा खेळ खल्लास झाल्याची स्पष्ट जाणीव जनतेतून व्यक्त होत आहे. यावेळी तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्



