प्रभाग क्रमांक १६ मध्ये रावेतच्या सोसायट्यांत भाजपचा झंझावात!
चारही उमेदवारांकडून केवळ विकासाची भाषा, विरोधी उमेदवारांपेक्षा भाजपला मतदारांची पसंती

पिंपरी : प्रभाग क्रमांक १६ मधील रावेत परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये भाजपचे उमेदवार दिपक भोंडवे, संगीता भोंडवे, शिल्पा राऊत, धर्मपाल तंतरपाळे यांनी रविवारी घरोघरी प्रचार केला. या भागात भाजपच्या चारही उमेदवारांनी आक्रमक, नियोजनबद्ध आणि प्रभावी प्रचार केला. सोसायटी ते सोसायटी, इमारत ते इमारत भाजपचे कार्यकर्ते आणि उमेदवारांनी थेट नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहता प्रभागातील राजकीय हवा स्पष्टपणे भाजपच्या बाजूने झुकलेली दिसत आहे.
रावेतमधील हाय-राईज सोसायट्या, नव्या वसाहती आणि मध्यमवर्गीय संकुलांमध्ये प्रचार करताना भाजपच्या चारही उमेदवारांनी भावनिक घोषणांपेक्षा ठोस विकासाचा अजेंडा पुढे ठेवला. पाणीपुरवठा, वाहतूक नियोजन, पार्किंग समस्या, स्ट्रीट लाईट, कचरा व्यवस्थापन, सुरक्षा, सीसीटीव्ही आणि सोसायट्यांच्या अंतर्गत रस्त्यांवरील प्रश्नांवर स्पष्ट भूमिका आणि वेळबद्ध उपाययोजना मांडल्याने नागरिकांचा विश्वास अधिक घट्ट होत आहे. भाजपच्या या चारही उमेदवारांचा प्रचार केवळ पोस्टर-बॅनरपुरता मर्यादित नसून, थेट संवाद, प्रश्नोत्तरांची चर्चा आणि प्रत्यक्ष समस्या ऐकून घेणारी कार्यपद्धती हे त्याचे वैशिष्ट्य ठरत आहे. त्यामुळे सोसायटीवासीयांमध्ये “यावेळी काम करणाऱ्यालाच संधी” हा सूर अधिक ठळक होत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून भाजपच्या प्रचारात सहभाग घेतल्याने विरोधकांची रणनीती गोंधळात पडली आहे.
विशेष म्हणजे, रावेत परिसरातील वेगवान शहरीकरण लक्षात घेता नियोजनबद्ध विकास, मजबूत प्रशासकीय पकड आणि केंद्र–राज्य समन्वय यावर भाजपने दिलेला भर नागरिकांच्या अपेक्षांशी थेट जुळतो आहे. त्यामुळे भाजपचा प्रचार येथे केवळ औपचारिक न राहता निर्णायक लढतीचा टर्निंग पॉइंट ठरत असल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक १६ मध्ये रावेतच्या सोसायट्यांमध्ये भाजपचा प्रचार धारदार, टोकदार आणि परिणामकारक ठरत आहे. विकासाची स्पष्ट दिशा, आक्रमक संवाद आणि संघटित यंत्रणेमुळे या परिसरात भाजपने राजकीय आघाडी घेतल्याचे संकेत आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत.



