बॅनर न्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अजितदादांची राजकीय सलामी

भाजप आणि शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Spread the love
पिंपरी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड हा राजकीय बालेकिल्ला पुन्हा परत मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. अजितदादांनी मंगळवारी भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही गटातील काही मातब्बरांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिक टिक पुन्हा वाजविण्यासाठी जोरदार राजकीय सलामी दिली आहे. 

पिंपरी-चिंचवड शहर हा राष्ट्रवादीचा किंबहुना अजित पवार यांचा बालेकिल्ला होता. अजितदादा पवार यांचा अपराजित असलेला गडकोट किल्ला म्हणूनच पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जात होते. परंतु, या राजकीय गडकोट किल्ल्याला भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी दोरदार धडक मारली आणि २०१७ मध्ये हा राजकीय किल्ला हस्तगत केला. त्यावेळी महापालिकेत प्रथमच कमळ फुलले. त्यानंतर शहराच्या राजकीय क्षेत्रात अनेक मोठे बदल होत गेले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले. आता हे दोन्ही पक्ष राज्याच्या सत्तेत एकत्र आहेत.

आता महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. सोमवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार झाडून कामाला लागले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणानंतर अजितदादांनी आपला पूर्वीचा बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी दुसऱ्या दिवसापासूनच कंबर कसली आहे. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी आणि इच्छुकांची अजितदादांनी मंगळवारी पुण्यात स्वतंत्र बैठक घेत सविस्तर चर्चा केली. त्यांनी संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा राजकीय आढावा घेतला. तसेच भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनी जाधव, शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे, शिवसेना ठाकरे गटाच्या महिला शहर संघटिका रुपाली आल्हाट तसेच चिखली येथील शिवसेना ठाकरे गटाच्या प्रबळ उमेदवार साधना काशीद यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन महापालिका निवडणुकीसाठी अजितदादांनी सलामी ठोकली आहे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button