प्रभाग क्रमांक १२ मध्ये मशालचा महास्फोट! खासदार ओमराजे निंबाळकरांचा भव्य रोडशो
तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगर परिसर दणाणला; अमोल भालेकर यांच्या प्रचाराला आक्रमक धार

पिंपरी : प्रभाग क्रमांक १२, तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्
प्रभाग क्रमांक १२ मध्ये “मशाल पेटली… बदल निश्चित!” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीमुळे रविवारी अमोल भालेकर यांच्या प्रचाराला केवळ वेगच नाही, तर आक्रमक आत्मविश्वास आणि निर्णायक धार मिळाली. प्रभागातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे रस्त्यांवर उतरून रोडशोला दिलेला प्रतिसाद हा जनतेचा कौल स्पष्टपणे मशालच्या बाजूने वळल्याचा ठोस संकेत देणारा ठरला आहे. या रोडशोदरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी माजी नगरसेवक आणि सत्ताधारी भाजपच्या अपयशी कारभारावर थेट प्रहार करत, प्रभागातील रखडलेले प्रश्न, दुर्लक्षित विकास आणि नागरिकांवर लादलेली अन्यायकारक व्यवस्था यावर जोरदार बोट ठेवले. “शब्द नाही, काम हवे आणि ते काम मशालच करणार,” असा ठाम संदेश त्यांनी दिला. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा संचारली.
रोडशो ज्या-ज्या भागातून गेला, तिथे मशालचा प्रकाश अधिक तेजस्वी होत गेला. तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व स्तरांतून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक १२ मधील ही निवडणूक आता केवळ औपचारिक उरलेली नसून जनतेच्या संतापाचा आणि बदलाच्या निर्धाराचा एल्गार बनल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रभाग क्रमांक १२ मध्ये मशाल चिन्हावर लढणारे अमोल भालेकर यांच्या प्रचाराने निर्णायक वळण घेतले आहे. खासदार ओमराजे निंबाळकरांच्या रोडशोने विरोधकांची गणिते कोलमडवली असून, मशाल हा केवळ चिन्ह नाही तर परिवर्तनाचा निर्णायक शस्त्र ठरत असल्याचे चित्र ठळकपणे समोर आले आहे.



