पिंपरी चिंचवड

प्रभाग क्रमांक १२, रुपीनगरमध्ये मशालचा प्रचार धडाका 

अमोल भालेकरांचा प्रचार म्हणजे सत्ताधाऱ्यांसाठी थेट इशारा

Spread the love
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२, तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्ये सध्या राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, मशाल चिन्हावर लढणाऱ्या अमोल भालेकर यांचा प्रचार सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकवणारा ठरत आहे. गल्लीबोळातून घुमणारे प्रश्न आणि नागरिकांचा उसळणारा संताप यामुळे प्रभाग पूर्णपणे ढवळून निघाला आहे. अमोल भालेकर यांनी शनिवारी रुपीनगरमध्ये घरोघरी जाऊन जनतेशी थेट संवाद साधत निवडणुकीत प्रभागात परिवर्तन करण्याची साद घातली. त्यांना जनतेतूनही तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  

वर्षानुवर्षे सत्तेत बसूनही मूलभूत सुविधांचा बोजवारा उडवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीची अमोल भालेकर यांनी प्रभाग क्रमांक १२ मध्ये घरोघरी जाऊन अक्षरशः चिरफाड सुरू केली आहे. रस्त्यांवरील खड्डे, पाण्याची अनिश्चितता, तुंबलेली ड्रेनेज आणि कचऱ्याचे साम्राज्य दाखवत “हा विकास कुणासाठी?” असा थेट सवाल त्यांनी नागरिकांसमोर उभा केला आहे. अमोल भालेकर यांच्या या प्रचारात नागरीकही आपला संयम सोडून या प्रभागात निवडणूक लढवत असलेल्या माजी नगरसेवक आणि सत्ताधाऱ्यांविरोधातील रोष उघडपणे व्यक्त करताना दिसत आहेत. प्रभागातील अनेक ठिकाणी “पाच वर्षे गायब आणि निवडणुकीत हजर” अशी बोचरी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत असून, निवडणूक लढवणाऱ्या माजी नगरसेवक आणि सत्ताधाऱ्यांची विश्वासार्हता पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र आहे.

अमोल भालेकर यांना प्रभागातील तरुण वर्ग, महिलावर्ग आणि सुशिक्षित मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता रुपीनगरमध्ये मशाल ही केवळ निवडणूक चिन्ह न राहता बंडखोरीचे प्रतीक बनली आहे. अमोल भालेकरांचा प्रचार हा औपचारिक न राहता, तो अपयशी कारभाराविरोधात उभा ठाकलेला जनस्फोट ठरत आहे. रुपीनगरमध्ये मशालचा प्रचार म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या अपयशावरचा थेट घाव आणि अमोल भालेकर यांचा आक्रमक प्रचार प्रभाग क्रमांक १२ मध्ये सत्ता बदलाची ठिणगी पेटवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावेळी प्रश्न विचारणारी मशाल पेटली आहे… आणि ती विझणार नाही, अशी भावना या प्रभागातील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button