बॅनर न्यूज

किवळे विकासनगर येथे भाजपच्या दिपक भोंडवे यांचा जोरदार प्रचार

Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी रावेत-किवळे-मामुर्डी प्रभाग क्रमांक १६ मधील भाजपचे इच्छुक उमेदवार दिपक भोंडवे यांनी शनिवारी किवळे विकासनगर परिसरात प्रचार केला. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी परिसरातील समस्या, विकासकामे आणि भविष्यातील आराखडा याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

या प्रचार दौऱ्यात भाजपचे दिपक भोंडवे यांनी स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांशी संवाद साधत परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, आरोग्य आणि युवकांच्या रोजगारासंदर्भातील प्रश्नांवर त्यांनी सकारात्मक आश्वासन दिले. “सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून किवळे विकासनगरसह संपूर्ण प्रभाग क्रमांक १६ च्या सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे,” असे त्यांनी सांगितले.

प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून आला. घोषणाबाजी, संवाद सभा आणि घराघरांत जाऊन मतदारांशी त्यांनी संपर्क साधला. स्थानिक नागरिकांनीही या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपला पाठिंबा दर्शविला. दिपक भोंडवे यांच्या या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक १६ मधील रावेत-मामुर्डी-किंवळे परिसरात महापालिका निवडणुकीचे राजकीय वातावरण तापत असून त्यांना नागरिकांकडून मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button