प्रभाग क्रमांक १२, तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्ये मशालने प्रत्येक मतदाराच्या मनात ठसा उमटवला
प्रचाराचा शेवट; मशालच्या अमोल भालेकर यांच्या विजयावर जनतेकडून शिक्कामोर्तब

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२, तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्
अमोल भालेकर हे उच्चशिक्षीत असून, ते तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगर प्रभागात अ जागेवर निवडणूक लढवत आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचार काळात पहिल्या दिवसांपासून अमोल भालेकर यांनी प्रभाग क्रमांक १२ मध्ये केलेल्या आक्रमक होम-टू-होम संवाद, थेट नागरिक भेटी आणि समस्यांवर निर्भीड भूमिका यामुळे संपूर्ण प्रभाग ढवळून निघाला. त्यांच्या प्रचारामुळे या निवडणुकीत मैदानात असलेल्या माजी नगरसेवकांनी प्रभागातील समस्यांकडे केलेले पाच वर्षांचे दुर्लक्ष, खोटी आश्वासने आणि अपयशी कारभाराविरोधात प्रभागातील जनतेचा रोष उफाळून आला आहे. जनतेच्या या रोषाला मशालच्या अमोल भालेकरांच्या प्रचाराने ठोस दिशा मिळाल्याचे स्पष्ट चित्र आहे.
संपूर्ण प्रचारात प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांनी जुने चेहरे, जुन्या घोषणा आणि जुन्या सबबींना साफ नकार दिला आहे. “निवडणूक आली की दर्शन आणि नंतर गायब” या फसव्या राजकारणाला कंटाळलेली जनता आता काम करणारा, रस्त्यावर दिसणारा आणि उत्तर देणारा नेता शोधत होती आणि तो चेहरा म्हणजे अमोल भालेकर, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. प्रचारादरम्यान नागरिकांचा एकच ठाम संदेश समोर आला “आता हिशेब हवा!”, “फोटोसेशन नको, प्रत्यक्ष काम हवं!”, “या वेळी मशाल पेटणारच!”. प्रभागात मशालच्या या वाढत्या लाटेमुळे विरोधी उमेदवारांची अवस्था पुरती गोंधळलेली दिसून आली. मुद्दे संपले, विश्वास ढासळला आणि प्रचारात धार उरलेली नाही, अशी परिस्थिती त्यांच्या गोटात निर्माण झाली. उलटपक्षी, अमोल भालेकरांच्या प्रचाराला मिळणारा उस्फूर्त प्रतिसाद पाहता या प्रभागातील अ जागेवर विजयाचे गणित जवळपास पूर्ण झाले असल्याचे संकेत मिळत आहेत.
आज प्रभाग क्रमांक १२ मध्ये चित्र स्पष्ट दिसत असून, जनतेचा कौल मशालच्या बाजूने ठाम झाला आहे. अमोल भालेकर यांच्या विजयावर प्रभागातील जनतेने जवळपास शिक्कामोर्तब केले असल्याचे चित्र दिसत आहे. ही निवडणूक आता केवळ उमेदवारांची न राहता, अपयशाविरुद्ध परिवर्तनाची, अहंकाराविरुद्ध उत्तरदायित्वाची आणि खोट्या वचनांविरुद्ध खऱ्या कामाची लढाई बनली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक १२ मध्ये बदल अटळ असून, प्रचारात मशाल हीच जनतेच्या विश्वासाची निशाणी ठरल्याचे चित्र ठळकपणे समोर आले आहे. या प्रभागात मशाल पेटलेली आहे आणि या प्रकाशात अमोल भालेकरांचा विजय हा अंदाज नाही, तो जनतेचा ठरलेला निकाल असणार असे स्पष्ट दिसत आहे.



