प्रभाग क्रमांक ८, इंद्रायणीनगर-बालाजीनगरमध्ये धनुष्यबाणाचा रणशिंग!
महेंद्र सरवदे – माधुरी मुटके मैदानात; विरोधी उमेदवारांची उडाली झोप

पिंपरी : प्रभाग क्रमांक ८, इंद्रायणीनगर- मोशी प्राधिकरण- सेक्टर क्रमांक १ ते १३-बालाजीनगर-गवळीमाथा-खंडेवस्तीमध्ये महापालिका निवडणुकीचा सामना आता आरपारच्या लढाईत बदलला आहे. धनुष्यबाणाच्या चिन्हावर अ जागेवर महेंद्र लक्ष्मण सरवदे आणि क जागेवर माधुरी नीलेश मुटके यांनी दंड थोपटले असून, प्रभागात परिवर्तनाचा एल्गार पुकारला आहे. ही केवळ उमेदवारी नसून, ही जनतेच्या रोषाची आणि विकासाच्या निर्धाराची ठिणगी मानली जात आहे. या दोघांच्या उमेदवारीमुळे प्रभागात वर्षानुवर्षे निवडून येऊन लोकांची कामे करण्याऐवजी महापालिकेत भ्रष्टाचार करून स्वतःचीच घरे भरणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रस्थापित उमेदवारांची झोप उडाल्याचे चित्र आहे
कामाचा ठसा, जनतेशी थेट नाळ आणि निर्भीड भूमिका यामुळे महेद्र सरवदे आणि माधुरी मुटके या दोघांनाही प्रभाग क्रमांक ८ मध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणाची उमेदवारी जाहीर होताच हे दोन उमेदवार जनतेची पहिली पसंती ठरत आहे. वर्षानुवर्षे फक्त आश्वासनं देणाऱ्यांना आता जनता घरचा रस्ता दाखवायला सज्ज झाली असून, गल्लीबोळांतून एकच आवाज घुमतोय आणि संपूर्ण प्रभागात “धनुष्यबाणच हवा!” असा निर्धार नागरिक करत आहेत.
झोपडपट्टी आणि मध्यमवर्गीयांची लोकवस्ती असलेल्या या प्रभागातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी वर्गासह सर्व घटकांचा उस्फूर्त पाठिंबा धनुष्यबाणाला मिळत असून, या दोन्ही उमेदावारंच्या प्रचाराच्या फेऱ्या सुरू झाल्यानंतर त्यांच्या प्रत्येक फेरीत विरोधकांची हवा निघेल अशी राजकीय स्थिती निर्माण होणार आहे. गल्ली-बोळांपासून चौकापर्यंत धनुष्यबाणाचीच चर्चा होताना दिसत आहे. महेंद्र सरवदे आणि माधुरी मुटके या दोघांच्या उमेदवारीने विरोधी पक्षाच्या काही उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली असून, तर काहींच्या फक्त सबबी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. असून प्रचाराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.



