बॅनर न्यूज

आम आदमी पार्टीकडून पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा

चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरात पूजा करून प्रचाराला सुरूवात

Spread the love

पिंपरी : आम आदमी पक्षाने पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. आपने शुक्रवारी चिंचवड येथील मोरया गोसावी महाराज मंदिरात पूजा करून महापालिका निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला.

यावेळी शहराध्यक्ष रविराज काळे म्हणाले, आम आदमी पक्ष पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक ताकदीने लढणार आहे. त्यासाठी आज श्रींच्या दर्शनाने पक्षाने प्रचाराची सुरूवात केली आहे. पक्षाकडून प्रत्येक प्रभागात जाऊन नागरीकांशी संवाद साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाच्या प्रचाराची सुरूवात प्रभाग क्रमांक १८ मधील उमेदवार ॲड. सचिन पवार यांच्या प्रचारासोबत करण्यात आली. स्थानिक प्रश्न, स्वच्छ प्रशासन आणि पारदर्शक कारभार या मुद्द्यांवर आम आदमी पक्ष ही निवडणूक लढणार आहे.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button