बॅनर न्यूज

बालाजीनगर-इंद्रायणीनगरमध्ये प्रत्येकाच्या मदतीला धावणारे महेंद्र सरवदे यांच्या प्रचाराचा धडाक्यात प्रारंभ

आपल्यासाठी आपल्यासारख्या माणसाची उमेदवारी समजून नागरिकांचा मिळतोय भरघोस प्रतिसाद

Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ – बालाजीनगर-इंद्रायणीनगर-स्पाईन रस्ता-खंडेवस्तीमध्ये आता बदलाचे वारे वाहू लागले असून, समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द उराशी बाळगून एक उच्चशिक्षित तरुण चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. महेंद्र लक्ष्मण सरवदे या तरुण आणि कल्पक कार्यकर्त्याने प्रभाग क्रमांक ८ मध्ये आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ अत्यंत उत्साहात केला आहे. 

महेंद्र लक्ष्मण सरवदे यांनी प्रभाग क्रमांक ८ – बालाजीनगर-इंद्रायणीनगर-स्पाईन रस्ता-खंडेवस्तीमधून “अ” जागेवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘तुमच्यासाठी तुमच्यासारख्या माणसाची उमेदवारी’ या टॅगलाइनसह ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ हा मंत्र घेऊन महेंद्र लक्ष्मण सरवदे यांनी आपल्या कार्याची नवी पाऊले टाकली आहेत.  महेंद्र लक्ष्मण सरवदे हे उच्चशिक्षित असून, एका मोठ्या कंपनीतील नोकरी सोडून त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. बालाजीनगर-इंद्रायणीनगर-खंडेवस्ती या भागातील अत्यंत सामान्य आणि गोरगरीब नागरिकांचे शिक्षण, आरोग्य आणि युवकांच्या रोजगाराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी सातत्याने लढा दिला आहे. अडचणीत असलेल्या प्रत्येक गोरगरीब नागरिकाच्या मदतीला ते कायम धावून गेले आहेत.

मदतीला धावणारा माणूस म्हणून महेंद्र लक्ष्मण सरवदे यांची ओळख आहे. या प्रभागात असणारी लोकप्रियता पाहून त्यांनी राजकारणात येऊ नये यासाठी प्रभागातीलच पैसेवाल्या माजी नगरसेविकेने पोलिसांना हाताशी धरून महेंद्र लक्ष्मण सरवदे यांना पिंपरी-चिंचवडमधून एक वर्षासाठी तडीपार करायला लावले होते. मात्र ते रडण्यापेक्षा लढण्यावर विश्वास ठेवणारे असल्याने त्यांनी उच्च न्यायालयापर्यंत धाव घेत पोलिसांनी केलेली बेकायदेशीर तडीपारी रद्द करून आणली होती. भरपूर संघर्ष तसेच स्वतः व त्यांच्या कुटुंबाने प्रचंड त्रास सहन करूनही महेंद्र लक्ष्मण सरवदे यांचा अडीअडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याचा स्वभाव बदललेला नाही. त्यांच्या याच कामाची पावती म्हणून आज बालाजीनगर आणि इंद्रायणीनगरमधील हजारो तरुणांनी महेंद्र लक्ष्मण सरवदे यांच्या प्रचाराची धुरा स्वतःहून आपल्या खांद्यावर घेतली आहे. यंदा महेंद्र लक्ष्मण सरवदे हे महापालिकेच्या सभागृहात दिसलेच पाहिजेत यासाठी तरुणांनी चंग बांधून त्यांच्या प्रचाराला आतापासूनच जोरदार सुरूवात केली आहे.

“विकासाचा नवा विचार मांडणार” – महेंद्र सरवदे 

“मी कोणताही राजकीय वारसा नसलेला एक सामान्य कार्यकर्ता आहे. पण सामान्य माणसाच्या समस्यांची मला जाण आहे. या निवडणुकीत मी केवळ मतं मागायला मतदारांपुढे जाणार नसून, परिवर्तनाचा नवा विचार घेऊन जात आहे. प्रभागातील बालाजीनगर व इतर झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब तरुणांच्या हाताला काम झोपडीधारक आणि ज्येष्ठांना सन्मान मिळवून देणे हेच माझे मुख्य ध्येय असेल. प्रभागातील नागरिकांना आजपर्यंत विकासाच्या नावखाली केवळ फसविण्याचे धंदे झाले आहेत. आता हा धंदा कायमचा बंद करून विकसित प्रभाग करण्याचा माझा उद्देश असेल, असे त्यांनी सांगितले.

घरोघरी जाऊन साधणार संवाद

केवळ सभा किंवा रॅलीपुरते मर्यादित न राहता महेंद्र लक्ष्मण सरवदे यांनी ‘डोअर टू डोअर’ (घरोघरी भेट) मोहिमेवर भर दिला आहे. लोकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्यावर उपाय शोधण्याचा त्यांचा मानस आहे. महेंद्र लक्ष्मण सरवदे यांनी प्रभाग क्रमांक ८ मध्ये निवडणुकीसाठी शड्डू ठोकले असून एका सुशिक्षित आणि तरुण लोकप्रतिनिधीला संधी देण्यासाठी नागरिक सकारात्मक असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button