प्रभाग क्रमांक १२ मधील जनतेचा आवाज, परिवर्तनाचा चेहरा – अमोल भालेकर
मैदानात उतरला खरा जनप्रतिनिधी; प्रभागातील जनता मशाल पेटवून प्रस्थापितांना धक्का देण्याच्या तयारीत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १२, तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्
तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमधील खड्ड्यांत गेलेले बहुतांश रस्ते, टँकरवरची तहान, कचऱ्यात बुडालेल्या वस्त्या, बेरोजगार तरुण आणि अपमानित सामान्य माणूस अशी प्रभाग क्रमांक १२ ची अवस्था आहे. या सगळ्या समस्या म्हणजे अपघात नाहीत, तर आतापर्यंत या प्रभागातून निवडून आलेल्या नेत्यांची ही अपयशी पापं आहेत. आता या पापांचा हिशोब द्यायची वेळ आली आहे. वर्षानुवर्षे जनतेच्या रक्तावर पोसलेली सत्ता, खोट्या आश्वासनांनी भरलेली भाषणे आणि प्रत्यक्षात शून्य कामगिरी आजपर्यंत या प्रभागातील जनता पाहत आली आहे. या प्रभागातील जनतेला आता मूर्ख समजण्याचा खेळ आता थांबणार आहे. कारण या जनतेचा आवाज बनण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल भालेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
कोणताही माज नाही, अहंकार नाही, फक्त प्रामाणिकपणा, संघर्ष आणि विकासाचा ध्यास घेऊन अमोल भालेकर हे या प्रभागातील अ जागेवर निवडणूक लढवीत आहेत. या प्रभागात मशाल चिन्हावर लढणारे अमोल भालेकर हे एकमेव उमेदवार आहेत. प्रभागात कायम निवडून येणाऱ्या प्रस्थापितांना धक्का देण्याच्या ताकदीने अमोल भालेकर हे घराघरात जाऊन जनतेशी संवाद, प्रत्येक समस्या ऐकून घेण्याची तयारी आणि “निवडणूक आली म्हणून नव्हे, तर कायम तुमच्यासोबत” हा ठाम विश्वास देत आहेत. यामुळेच प्रभाग क्रमांक १२ मध्ये अमोल भालेकर यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा दिसून येत आहे.
आता वेळ आली आहे बदलाची, आता वेळ आली आहे काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी देण्याची या भावनेतून प्रभाग क्रमाक १२ मधील नागरिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल भालेकर यांचा जागोजागी अत्यंत उत्साहात आणि जल्लोषपूर्ण स्वागत करत आहेत. हवाय धडाडीचा, धक्का देणारा नेता, हवाय सत्तेला घाम फोडणारा प्रतिनिधी, हवाय जनतेच्या प्रश्नांवर उभा ठाकणारा बंडखोर आवाज म्हणून प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिक अमोल भालेकर यांच्या पाठीशी उत्स्फूर्तपणे उभे ठाकत असल्याचे चित्र आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनशक्तीवर लढणाऱ्या उमेदवारांना अमोल भालेकर हे जनशक्ती जोरावर निवडणुकीत चितपट करतील, असे राजकीय चित्र प्रभाग क्रमांक १२ मध्ये तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांना मिळणारा जनतेचा प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक १२ मध्ये अमोल भालेकर हे निवडणुकीत विजयाची मशाल पेटवतील, अशी शक्यता दिसत आहे.



