प्रभाग क्रमांक १५ मध्ये प्रचार बंद, घड्याळाच्या धनंजय काळभोरांच्या बाजूने जनतेचा कौल
धनंजय काळभोरांवर मतदारांचा विश्वास; आकुर्डी गावठाण-निगडी प्राधिकरणमध्ये घड्याळाच्या विजयाची दिशा स्पष्ट

प्रभाग क्रमांक १५ मधील अ जागेवर घड्याळ चिन्हावर लढणारे धनंजय काळभोर उच्चशिक्षीत असून, त्यांनी महापालिकेत या भागाचे पाच वर्षे नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. यंदाच्या निवडणूक प्रचाराच्या संपूर्ण कालावधीत धनंजय काळभोर यांनी प्रभागातील जनतेशी थेट जनसंवाद, सातत्यपूर्ण उपस्थिती आणि प्रभागातील विविध प्रश्नांवर स्पष्ट भूमिका ठेवत आपली वेगळी ओळख निर्माण केली. रस्ते, पाणी, स्वच्छता, रखडलेली कामे आणि नागरिकांच्या तक्रारी या मुद्द्यांवर टाळाटाळ न करता थेट उत्तर देणारा आणि या प्रभागाच्या विकासासाठी दूरदृष्टी असणारा उमेदवार म्हणून धनंजय काळभोर यांची प्रतिमा प्रभागात ठळक झाली.
“निवडणूक आली की दर्शन” देणाऱ्या जुन्या पद्धतीला कंटाळलेली जनता यावेळी काम, विश्वास आणि उत्तरदायित्व यांचा विचार करत असल्याचे चित्र प्रचाराच्या शेवटी स्पष्टपणे समोर आले. या प्रबागात घड्याळाच्या प्रचाराला मिळालेला प्रतिसाद केवळ सभा-मैदानापुरता मर्यादित न राहता, गल्ल्या, वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला. प्रचार काळात घड्याळाच्या बाजूने आत्मविश्वासपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. मुद्द्यांवर आधारित प्रचार, अनाठायी आरोपांपासून अंतर आणि मतदारांशी थेट संवाद या तीन गोष्टींमुळे धनंजय काळभोर यांची बाजू अधिक भक्कम झाल्याचे जाणवते.
आज प्रभाग क्रमांक १५ मध्ये चित्र ठाम आहे. घड्याळाचे धनंजय काळभोर हेच मतदारांच्या निर्णयाच्या केंद्रस्थानी आहेत. धनंजय काळभोर यांच्या आक्रमक, निर्भीड आणि थेट जनसंवादाने या प्रभागात निवडणूक लढवीत असलेले माजी नगरसेवक अक्षरशः निरुत्तर झाल्याचे चित्र आहे. पाच वर्षांच्या दुर्लक्षाचा हिशेब, खोट्या आश्वासनांची यादी आणि अपयशाचा ठोस आरसा जनतेसमोर उभा राहताच माजी नगरसेवकांचा दिखाऊपणा प्रचारात समोर आला. या प्रभागात घड्याळाच्या धनंजय काळभोर यांचा प्रचार म्हणजे माजी नगरसेवकांच्या अपयशावर उमटवलेली जनतेची सही ठरली आहे. आता उरले आहे ते मतदानाचे अंतिम पाऊल. पाच वर्षांचा हिशेब आणि पुढील काळाचा निर्णय मतदार देणार असून, प्रचाराच्या शेवटी तयार झालेले वातावरण पाहता प्रभाग १५ मध्ये घड्याळाच्या धनंजय काळभोर यांच्या बाजूने कौल स्पष्ट झाल्याचे दिसत आहे.



