प्रभाग क्रमांक १२, तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्ये मशाल इतिहास घडविणार!
भाजप–राष्ट्रवादीच्या राजकीय भांडणात अमोल भालेकरांना जनतेची सर्वाधिक पसंती

पिंपरी : प्रभाग क्रमांक १२, तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्
भाजप व राष्ट्रवादीच्या पारंपरिक राजकीय भांडणाला कंटाळलेल्या प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांनी यंदा बदलाचा कौल देण्याचा इरादा पक्का केल्याचे दिसत आहे. उच्चशिक्षित, स्वच्छ प्रतिमा, थेट जनसंपर्क आणि ठोस विकासाचा अजेंडा घेऊन मैदानात उतरलेल्या आणि मशाल चिन्हावर लढणाऱ्या अमोल भालेकरांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घराघरात होत असलेला संवाद, युवकांचा प्रचंड पाठिंबा आणि ज्येष्ठांचा विश्वास यामुळे मशाल चिन्हाने प्रभाग क्रमांक १२ मध्ये नवे राजकीय समीकरण तयार केले आहे.
“प्रभागाचा विकास हेच ध्येय” या भूमिकेवर ठाम असलेल्या अमोल भालेकर यांनी केवळ आश्वासनांवर नव्हे तर कामावर आधारित राजकारण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळेच भाजप–राष्ट्रवादीच्या बलाढ्य यंत्रणेसमोरही प्रभाग क्रमांक १२ मध्ये मशाल चिन्ह अधिक तेजाने पेटताना दिसत आहे. हा तेज प्रचाराच्या रणधुमाळीत दिवसेंदिवस आणखी उजळत असल्याचे चित्र आहे. राजकीय जाणकारांच्या मते, प्रभाग क्रमांक १२ मध्ये यंदा इतिहास घडण्याची चिन्हे स्पष्ट असून, जनतेच्या विश्वासावर उभा असलेला मशाल चिन्हावरील उमेदवार अमोल भालेकर हे विजयाच्या दिशेने ठामपणे आगेकूच करत आहेत. यंदा केवळ निवडणूक नाही, तर जनतेच्या मनात बदलाची मशाल पेटलेली आहे, असे प्रभाग क्रमांक १२ मध्ये दिसत आहे.



