बॅनर न्यूज
पिंपरी-चिंचवड भाजपचे सचिन काळभोर यांच्या वतीने वारकऱ्यांना दोन ट्रक केळीचे वाटप

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांच्या वतीने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांना दोन ट्रक केळीचे वाटप करण्यात आले. तसेच पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती देऊन सत्कार करण्यात आला.
निगडी गावठाण येथे ही वारकरी सेवा करण्यात आली. यावेळी आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, भाजपचे प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, अनुप मोरे, शहर सरचिटणीस नामदेव ढाके, पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे, माजी नगरसेविका कमल घोलप, बापू घोलप आदी उपस्थित होते.
तसेच पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चहा, नाष्टा व बिस्किटांचे आणि अत्यावश्यक औषधांचेही मोफत वाटप करण्यात आले.