भाजपच्या दिपक भोंडवे यांचा सलग तिसऱ्या दिवशी किवळेमध्ये प्रचाराचा झंझावात

पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या दिपक भोंडवे यांनी रावेत-किवळे-मामुर्डी प्रभाग क्रमांक १६ मध्ये प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. त्यांनी किवळेतील विकासनगर परिसरात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार प्रचार फेरी काढत मतदारांशी थेट संवाद साधला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध भागांत भेटी, पदयात्रा आणि संवाद सभांच्या माध्यमातून त्यांनी मतदारांसमोर आपली भूमिका प्रभावीपणे मांडली.
या प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण व आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांबाबत भाजपच्या दिपक भोंडवे यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केल्या. दिपक भोंडवे यांनी सर्व मुद्द्यांची नोंद घेत विकासाभिमुख, पारदर्शक आणि लोकहिताला प्राधान्य देणारे काम प्रभाग क्रमांक १६ मध्ये करण्याचे वचन मतदारांना दिले. तसेच भाजपच्या दिपक भोंडवे यांनी नागरिकांना आपल्या प्रचार पत्रकाचे वाटप केले.
तिसऱ्या दिवशीही प्रचाराचा उत्साह कायम असून कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी नागरिकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आणि वाढता पाठिंबा पाहता भाजपच्या दिपक भोंडवे यांच्या प्रभाग क्रमांक १६ मधील प्रचाराला चांगलीच गती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.



