बॅनर न्यूज

प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटला

“विकास, विश्वास आणि विजयानिश्‍चिती”चा संकल्प

Spread the love

पिंपरी : प्रभाग क्रमांक १६, रावेत, गुरूद्वारा-किवळे-मामुर्डीमध्ये भारतीय जनता पक्षाने शनिवारी निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. या प्रभागातील भाजपच्या चारही उमेदवारांनी आक्रमक आणि जोशपूर्ण शुभारंभ करत राजकीय रणधुमाळीला सुरुवात केली. “विकास, विश्वास आणि विजयानिश्‍चिती” या ठाम संकल्पनेसह प्रभाग क्रमांक १६ मधील भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, घराघरांत जाऊन जनतेशी थेट संवाद साधला जात आहे.

प्रभाग क्रमांक १६ मध्ये धर्मपाल तंतरपाळे, शिल्पा राऊत, संगीता भोंडवे आणि दिपक भोंडवे हे चार उमेदवार भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. या चारही उमेदवारांनी रावेतगावचे ग्रामदैवत श्री धर्मनाथ मंदिरात शनिवार आशिर्वाद घेत प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर चारही उमेदवारांनी विजयाचा शंखनाद करत आक्रमक प्रचाराला सुरूवात केली. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या या झंझावाती प्रचाराला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी करत आणि पक्षाचे ध्येय-धोरण जनतेसमोर मांडत भाजपच्या चारही उमेदवारांनी विरोधकांना स्पष्ट इशारा दिला आहे. “काम करणाऱ्यांनाच मत” हा स्पष्ट संदेश देत निवडून आल्यानंतर प्रभागाचा कायापालट करण्यासाठी केल्या जाणाऱ्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला.

स्थानिक प्रश्न, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते आणि सुरक्षा या मुद्द्यांवर भाजपचे चारही उमेदवार ठोस आश्वासनांसह मैदानात उतरले आहेत. त्यामुळे प्रभागातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून, प्रभाग १६ मध्ये भाजपचाच झेंडा फडकणार, असा आत्मविश्वास नेत्यांनी व्यक्त केला. “प्रभाग १६ मध्ये विकासाची गती – भाजपचा विजय निश्चित!”, असा नारा देत किवळेगावात घरोघरी जाऊन नागरिकांचे आशिर्वाद घेतले. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक सर्वच घटकांनी या प्रचारात सहभाग नोंदवला. “जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष आणि विकासासाठी कटिबद्धता” हा निर्धार उमेदवाराने यावेळी व्यक्त केला. आगामी काळात प्रचार अधिक वेगाने आणि आक्रमक पद्धतीने राबवण्याचा निर्धार उमेदवार व कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपच्या चारही उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडत निवडणुकीच्या मैदानात उतरताच प्रभाग क्रमांक १६ मधील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button