अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या; पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मागणी
पिंपरी : बदलापूर येथे दोन लहान चिमुकल्यांवर झालेला अत्याचार, कलकत्ता येथील महिला डॉक्टर भगिनीवर झालेला अत्याचार आणि उरण येथे घडलेल्या हत्याकांडा विरोधात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मूक मोर्चा तसेच निषेधाची स्वाक्षरी अभियान आंदोलन करण्यात आले. अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तुषार कामठे म्हणाले, “अकार्यक्षम गृहमंत्री हे पक्ष फोडण्यामध्ये, घर फोडण्यामध्ये तसेच संपूर्ण वेळ प्रचारामध्ये व्यस्त असल्याकारणाने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत त्यांना गांभीर्य उरलेले दिसून येत नाही. कधी नव्हे तो एवढा कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासनाला संपूर्ण वेळ सरकारी खर्चावर चाललेल्या प्रचारासाठी व सत्तेतील नेत्यांना सुरक्षा पुरवण्यामध्ये जुंपण्यात आलेले आहे. या सर्वाची जबाबदारी स्वीकारून अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.”
यावेळी माजी नगरसेवक अजित गव्हाणे, गणेश भोंडवे, सुलक्षणा शिलवंत धर, प्रियंका बारसे, विनायक रणसुभे, नंदकुमार शिंदे, डॉ. अभय तांबिले, संतोष कवडे, प्रशांत सपकाळ, कविता कोंडे, अनिल भोसले, संदीप चव्हाण, गणेश काळे, सागर चिंचवडे, संजय पडवळ, धम्मराज साळवे, श्रीमंत जगताप, हेमंत बलकवडे, वंदना आराख, मनीषा शेळके, मोहम्मद सय्यद, लता सूर्यवंशी, राजेश रोचीरामणी, सचिन गायकवाड, गणेश भांडवलकर, काशिनाथ जगताप आदी उपस्थित होते.