प्रभाग क्रमांक १२ मध्ये माजी नगरसेवक फेल, अमोल भालेकर हिट
तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्ये अमोल भालेकरांच्या मशालची वणवा बनून विजयाकडे झेप

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२, तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्ये आता निवडणूक राहिलेली नाही, तर अपयशी माजी नगरसेवक आणि सत्ताधारी भाजपचा जनतेकडून जाहीर निकाल सुरू झाला आहे. वर्षानुवर्षे खुर्चीला चिकटून बसलेले, कामाऐवजी केवळ टक्केवारी, सेटिंग आणि स्वार्थ जपणारे प्रभागातील जुने चेहरे पूर्णपणे फेल ठरले असून नागरिकांनी त्यांना प्रचारातून अक्षरशः हद्दपार केल्याचे चित्र आहे. दुसरीकडे या प्रभागात मशाल चिन्हावर लढणारे उच्चशिक्षित असणारे अमोल भालेकर हेच प्रभागातील नवे, विश्वासार्ह आणि लढाऊ नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. त्यांना प्रभागातील जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
प्रभाग क्रमांक १२ मधील रस्ते उध्वस्त, पाणी प्रश्न गंभीर, ड्रेनेजची अवस्था दयनीय, कचऱ्याचे साम्राज्य आणि गुंडगिरीला मोकळे रान हेच जुन्या नगरसेवकांचे तथाकथित “विकास मॉडेल” आताच्या प्रचारात उघडे पडले आहे. पाच वर्षे प्रभागाकडे पाठ फिरवणारे नेते आता गल्लीबोळांत फिरताना नागरिकांच्या रोषाला सामोरे जात आहेत. याच पार्श्वभूमीवर या प्रभागात मशाल चिन्हावर लढणारे अमोल भालेकर हे प्रभाग १२ मधील जनतेचा संताप, अपेक्षा आणि बदलाची आग बनून मैदानात उतरले आहेत. त्यांचा प्रचार म्हणजे फक्त सभा नव्हे, तर अपयशावर थेट आरोपपत्र ठरत आहे. त्यांच्या प्रचारामुळे प्रभागातील गल्ल्या, वस्ती, सोसायट्या, चौक सर्वत्र एकच आवाज घुमतोय तो म्हणजे “जुने चेहरे नकोत, आता हिशेब हवा!”, “फोटोसेशनचे नेते नकोत, काम करणारा माणूस हवा!” मशालच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहून निवडणूक रिंगणात माजी नगरसेवकांची झोप उडाली असून त्यांचे चेहरेच त्यांच्या पराभवाची साक्ष देत आहेत.
सभा कमी, अफवा जास्त; मुद्दे नाहीत, सबबी भरपूर अशी या प्रभागात निवडणूक लढविणाऱ्या माजी नगरसेवकांची अवस्था झाली आहे. अमोल भालेकरांची मशाल वणव्यासारखी पसरत विजयाच्या दिशेने धाव घेत आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा, अतिक्रमण, सुरक्षेचे प्रश्न अशा असंख्य समस्यांवर फक्त आश्वासनांची पेरणी करणाऱ्या माजी नगरसेवक आणि सत्ताधारी भाजप विरोधात प्रभागातील जनतेचा रोष उफाळून आला आहे. “पाच वर्षे गायब आणि निवडणुकीच्या तोंडावर दर्शन” देणाऱ्या नेत्यांना नागरिकांनी स्पष्ट शब्दांत ‘नको’ म्हणायला सुरुवात केली आहे. याच्या उलट मशाल चिन्हावर लढणारे अमोल भालेकर हे सुरुवातीपासूनच रस्त्यावर उतरून नागरिकांशी थेट संवाद साधताना दिसत आहेत. गल्लीबोळातून, वस्त्यांमधून, सोसायट्यांतून एकच सूर उमटतोय आणि तो म्हणजे “काम करणारा माणूस हवा, फोटोसेशनचा नेता नको!”.
अमोल भालेकरांची मशाल हीच जनतेच्या विश्वासाची आणि विजयाची निशाणी ठरत असल्याचे चित्र दिवसेंदिवस प्रभागात अधिक ठळक झाली आहे. प्रभाग क्रमांक १२ ही निवडणूक आता पक्षाची नाही, तर जनतेच्या आत्मसन्मानाची झाली आहे. ही लढाई लूट विरुद्ध लोकहित, अपयश विरुद्ध परिवर्तन आणि माज विरुद्ध जनतेची ताकद यांच्यातील झाली आहे. प्रभाग क्रमांक १२ मध्ये बदल रोखणे आता कोणाच्याही हातात राहिले नसल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रभागात आता मशाल पेटली आहे आणि या आगीत जुनी सत्ता जळून खाक होणार, हे निश्चित अशी प्रतिक्रिया जनतेमधून येत आहे.



