प्रभाग क्रमांक १२, तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्ये मशालचा रणघोष!
अमोल भालेकरांची प्रभागात भव्य दुचाकी रॅली काढून प्रचाराचा दणदणीत शेवट

पिंपरी : प्रभाग क्रमांक १२, तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्
रॅलीदरम्यान नागरिकांनी घराबाहेर येत टाळ्या वाजवत, हात हलवत, तर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करत अमोल भालेकर यांचे स्वागत केले. अनेक ठिकाणी नागरिक घराबाहेर येऊन टाळ्यांचा कडकडाट, अभिवादन, तर काही ठिकाणी पुष्पवृष्टी करत विजयाचा आशीर्वाद देत होते. ही रॅली केवळ प्रचार नव्हता, तर प्रभागातील जनतेने बदलावर शिक्कामोर्तब केल्याचा स्पष्ट संदेश होता. तरुणांचा प्रचंड उत्साह, महिलांचा भरघोस पाठिंबा आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाने ही रॅली म्हणजे विजयाची रंगीत तालीमच होती.
अमोल भालेकर यांनी यावेळी सांगितले की, “ही मशाल केवळ चिन्ह नाही, ती अन्यायाविरोधातील लढ्याची आहे. प्रभाग १२ मधील प्रत्येक समस्या, प्रत्येक नागरिकाचा आवाज महापालिकेत पोहोचवण्याची जबाबदारी मी घेणार आहे. हा विजय जनतेचा असेल!”
संपूर्ण प्रचार काळात घराघरांत पोहोचलेले काम, थेट संवाद आणि सातत्याने उपस्थिती यामुळे अमोल भालेकर हे प्रभागातील जनतेचे विश्वासू नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. दुचाकी रॅलीने हा विश्वास पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित केला. प्रभाग क्रमांक १२ मध्ये उत्साह, विश्वास, आणि बदलाची लाट स्पष्टपणे मशालच्या बाजूने झुकलेली दिसत आहे. दुचाकी रॅलीसह प्रचाराचा पडदा खाली आला असला, तरी विजयाची मशाल आता पेटलेली आहे आणि प्रभाग १२ बदलासाठी सज्ज झाला आहे.



