बॅनर न्यूज

प्रभाग क्रमांक १२ मध्ये घड्याळ-कमळ फिकी; मशाल ठरतेय सरस आणि निर्णायक

शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार अमोल तुकारम भालेकर यांची मशाल आलीय, बदल निश्चित!

Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२, तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्ये निवडणुकीचा सामना आता स्पष्टपणे रंगात आला असून घड्याळ आणि कमळाच्या प्रचारावर मशालने थेट आघाडी घेतली आहे. या प्रभागात मशाल चिन्हावर अ जागेवर लढणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल तुकाराम भालेकर यांनी निवडणुकीच्या प्रचारात घड्याळ आणि कमळाच्या तुलनेत धडकी भरवणारी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे तळवडे गावठाण, रुपीनगर आणि त्रिवेणीनगर परिसरात सध्या एकच चर्चा—“मशाल आलीय, बदल निश्चित!” असा आहे. 

प्रभाग क्रमांक १२ मध्ये वर्षानुवर्षे सत्तेत असूनही नागरिकांना फक्त आश्वासनांची पोकळी देणाऱ्या घड्याळ-कमळाच्या उमेदवारांसमोर मशाल चिन्हावर लढणाऱ्या अमोल भालेकरांचा प्रचार वादळासारखा धडकतो आहे. गल्लीबोळात, चौकात आणि घराघरांतून उसळणारा प्रतिसाद पाहता जनता आता जुन्या चेहऱ्यांना साफ नकार देण्याच्या भूमिकेत दिसत आहे. किंबहुना या प्रभागातील जनतेने तशी मनाची निश्चिती केल्याचेच जाणवत आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा, आरोग्य या प्रश्नांवर घड्याळ आणि कमळाने केलेल्या अपयशाचा थेट जाब विचारत मशालचा प्रचार अधिक आक्रमक होत चालला आहे. “सत्ता मिळवली, पण प्रभाग विसरले” या आरोपांमुळे घड्याळ आणि कमळाची प्रचारधुरा पूर्णपणे ढासळताना दिसत आहे.

तरुणांचा प्रचंड उत्साह, महिलांचा ठाम पाठिंबा आणि ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास यामुळे अमोल तुकाराम भालेकर यांच्या मशाल चिन्हाचा प्रचार केवळ उठावदार नाही, तर यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची लक्षणे स्पष्ट आहेत. अनेक ठिकाणी घड्याळ-कमळाच्या प्रचाराला मिळणारा अल्प प्रतिसाद आणि मशालच्या सभोवती जमणारी गर्दी हेच वास्तव बोलके ठरत आहे. एकूणच प्रभाग क्रमांक १२ मध्ये ही निवडणूक आता घड्याळ-कमळ विरुद्ध मशाल अशी न राहता, अपयश विरुद्ध परिवर्तन अशी बनली असून या लढतीत अमोल तुकाराम भालेकर यांची मशाल स्पष्टपणे सरस ठरत असल्याचे चित्र आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२, तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्ये मशाल फक्त पेटलेली नाही, तर ती निकालाची दिशा ठरवणार आहे, हे मात्र निश्चित. 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button