बॅनर न्यूज
महापालिका निवडणुकीसाठी २० किंवा २२ डिसेंबरला आचारसंहिता
भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तारीख सांगितली

पिंपरी : भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता काधी लागणार आहे याची तारीख सांगितली. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी २० किंवा २२ डिसेंबरला आचारसंहिता लागणार असल्याचा दावा त्यांनी गुरूवारी केला. तसेच पिंपरी-चिंचवडमधील इच्छुकांकडून भाजप पुढील चार दिवसांत उमेदवारी अर्ज मागविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ही बैठक पिंपळेसौदागर येथे झाली. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, महापालिका निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, एका खासगी संस्थेच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांचा सर्व्हे केला जाईल. सर्व्हेच्या आधारे कोणाचे नाव पुढे आहे, त्यानुसार क्रमांक टाकले जातील. पूर्णपणे सर्व्हेच्या आधारे उमेदवारीचा निर्णय केला जाणार नाही, तर केवळ आधार मानले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.



