बॅनर न्यूज

आमदार शंकर जगताप यांचे भोसरी मतदारसंघावर आहे लक्ष

चोवीसावीडीतील दुःखद घटनेविषयी अधिवेशनात विचारला प्रश्न

Spread the love

पिंपरी : चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध समस्यांवर चांगलेच लक्ष घातले आहे. आमदार शंकर जगताप यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील चोवीसावाडी येथे दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या एका दुःखद घटनेकडे नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले आहे. चोवीसावाडी येथे दसऱ्याच्या दिवशी म्हणजे २ ऑक्टोबर २०२५ रोजी एका हौसिंग सोसायटीच्या लिफ्टमध्ये अडकून एका १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. अमेय साहेबराव फडतरे (वय १२) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व आमदार शंकर जगताप यांनी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारून सर्व हौसिंग सोसायट्यांमधील लिफ्टची तपासणी झाली आहे काय?, तसेच लिफ्टची तपासणी झालेली नसल्यास काय कारवाई करण्यात आली आहे?, याची विचारणा केली आहे. त्यामुळे हौसिंग सोसायट्यांमधील निकृष्ट दर्जाच्या लिफ्टचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आमदार जगताप यांनी विचारलेल्या या प्रश्नांवर मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्व लिफ्टच्या तांत्रिक तपासणीची कार्यवाही सुरू असल्याचे उत्तरात नमूद केले आहे.  

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button